ओसरगाव टोल नाक्यावर उद्यापासून टोल वसुली!; महामार्गाची प्रलंबित कामे नाही, पण टोलची घाई

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 01:32 PM2022-05-26T13:32:00+5:302022-05-26T13:32:22+5:30

वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे

Toll collected at Osargaon Toll Naka from tomorrow, No pending highway works, but toll rush | ओसरगाव टोल नाक्यावर उद्यापासून टोल वसुली!; महामार्गाची प्रलंबित कामे नाही, पण टोलची घाई

ओसरगाव टोल नाक्यावर उद्यापासून टोल वसुली!; महामार्गाची प्रलंबित कामे नाही, पण टोलची घाई

googlenewsNext

कणकवली : राष्ट्रीय महामार्गाची अनेक कामे अद्याप अपूर्णावस्थेत असताना टोल नाका मात्र सुरू करण्यात येत आहे. उद्या, शुक्रवार (दि.२७) पासून कणकवली तालुक्यातील ओसरगाव टोलनाक्यावरून टोलवसुली सुरु करण्यात येणार असल्याची माहिती ठेका मिळालेल्या एम. डी. करीमुनिसा कंपनीकडून देण्यात आली आले.

राष्ट्रीय महामार्ग ६६ ची अनेक कामे अद्याप अपूर्णावस्थेत आहेत. मात्र असे असताना ओसरगाव टोलनाक्यावरून उद्यापासून टोलवसुली सुरू करण्यात येणार आहे. याबाबत वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

सिंधुदुर्गवासीयांच्या भूमिकेकडे लक्ष

टोल नाक्याच्या परिसरापासून वीस किलोमीटर परिघामध्ये येणाऱ्या वाहनांना मासिक ३१५ रुपयाचा पास देण्यात येणार आहे. त्या व्यतिरिक्त इतर वाहनांना टोल भरावा लागणार आहे. दुचाकी व तीनचाकी गाड्यांना टोल मधून सूट देण्यात आली आहे. तसेच फास्ट टॅग असलेल्या वाहनांना टोलची पन्नास टक्के रक्कम भरावी लागणार आहे. त्यामुळे या टोल वसुलीबाबत सिंधुदुर्गवासीय पुढची काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: Toll collected at Osargaon Toll Naka from tomorrow, No pending highway works, but toll rush

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.