तोरसोळे गाव ठरला कोरोना हॉटस्पॉट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 01:57 PM2021-05-08T13:57:24+5:302021-05-08T13:59:36+5:30

CoronaVIrus Sindhudurg : देवगड तालुक्यातील तोरसोळे गावातील ग्रामस्थांचे आरोग्य विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या कोरोना चाचणी कॅम्पमध्ये ५७ ग्रामस्थांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने तोरसोळे गाव कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे.

Torsole village became Corona hotspot | तोरसोळे गाव ठरला कोरोना हॉटस्पॉट

तोरसोळे गाव ठरला कोरोना हॉटस्पॉट

Next
ठळक मुद्देतोरसोळे गाव ठरला कोरोना हॉटस्पॉट ५७ ग्रामस्थांची चाचणी पॉझिटिव्ह

शिरगांव : देवगड तालुक्यातील तोरसोळे गावातील ग्रामस्थांचे आरोग्य विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या कोरोना चाचणी कॅम्पमध्ये ५७ ग्रामस्थांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने तोरसोळे गाव कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे.

तोरसोळे येथील ग्रामपंचायतीच्या इमारतीत घेण्यात आलेल्या कॅम्पमध्ये १९७ ग्रामस्थांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यामध्ये ५७ ग्रामस्थांची चाचणी पॉझिटिव्ह आली असून, एका ग्रामस्थाला संदर्भसेवा देण्यात आली आहे. ५६ जणांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

कॅम्पमध्ये शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. ए. पी. कोर्टुरवार, इळये प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गुरुप्रसाद महेंद्रकर, आरोग्य सहायक संदेश रणसिंग, आरोग्यसेविका भारती राणे, ए. के. इंदप, प्रयोगशाळा सहायक सायली मिठबावकर, ग्रामसेवक रामचंद्र राऊळ, आशा स्वयंसेविका सुप्रिया गिरकर, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी सहभागी झाले होते.

आरोग्य विभागाचा तपासणी कॅम्प

तोरसोळे गावात गेल्या आठ दिवसांत कोरोनामुळे सहा जणांचा मृत्यू झाला तर सहा ग्रामस्थ जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेरील रुग्णालयात उपचार घेत आहेत. याबाबत भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदीप साटम यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष कोंडके यांच्याशी संपर्क साधून याबाबतची वस्तुस्थिती मांडली. डॉ. संतोष कोंडके यांनी तातडीने तोरसोळे गावाला भेट देत ग्राम सनियंत्रण समिती, ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधून तोरसोळे गावात आरोग्य विभागाच्या वतीने ६ मे रोजी कोरोना तपासणी कॅम्पचे नियोजन करण्यात केले होते.

Web Title: Torsole village became Corona hotspot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.