कणकवलीत ३१ जानेवारी पासून पर्यटन महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 04:50 PM2019-01-28T16:50:19+5:302019-01-28T16:52:18+5:30

कणकवली नगरपंचायतीच्यावतीने ३१ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत ' कणकवली पर्यटन महोत्सव २०१९' आयोजित करण्यात आला आहे. या कालावधीत फूड फेस्टिव्हल, होम मिनिस्टर , शरीर सौष्ठव , चित्ररथ स्पर्धा व शोभायात्रा , ब्युटी क्वीन व मिस्टर हँडसम स्पर्धा असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. कणकवली वासीयांसाठी महोत्सवाच्या रूपाने मनोरंजनाची एक महापर्वणीच उपलब्ध होणार आहे. अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी येथे दिली.

Tourism Festival from 31st January in Kankavli | कणकवलीत ३१ जानेवारी पासून पर्यटन महोत्सव

कणकवलीत ३१ जानेवारी पासून पर्यटन महोत्सव

googlenewsNext
ठळक मुद्देकणकवलीत ३१ जानेवारी पासून पर्यटन महोत्सवरसिकांसाठी मनोरंजनाची महापर्वणी : समीर नलावडे यांची माहिती

कणकवली : कणकवली नगरपंचायतीच्यावतीने ३१ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत ' कणकवली पर्यटन महोत्सव २०१९' आयोजित करण्यात आला आहे. या कालावधीत फूड फेस्टिव्हल, होम मिनिस्टर , शरीर सौष्ठव , चित्ररथ स्पर्धा व शोभायात्रा , ब्युटी क्वीन व मिस्टर हँडसम स्पर्धा असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. कणकवली वासीयांसाठी महोत्सवाच्या रूपाने मनोरंजनाची एक महापर्वणीच उपलब्ध होणार आहे. अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी येथे दिली.

कणकवली नगरपंचायत कार्यालयाच्या नगराध्यक्ष दालनात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक संजय कामतेकर, बंडू हर्णे, अभिजित मुसळे, अबीद नाईक, मेघा गांगण, प्रतीक्षा सावंत आदी उपस्थित होते.

समीर नलावडे पुढे म्हणाले, कणकवली वासीयांचा हा महोत्सव म्हणजे आनंद, मज्जा, खाद्यजत्रा, नाटक, करमणूक, संगीत यांचा सर्वांगसुंदर मिलाप आहे. या महोत्सवाच्या अंतर्गत ३१ जानेवारी रोजी फूड फेस्टिव्हल होणार असून उदघाटन प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, स्वाभिमान पक्ष महिला जिल्हाध्यक्षा प्रणिता पाताडे, पंचायत समिती सभापती सुजाता हळदिवे या उपस्थित राहणार आहेत.

याच दिवशी महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धा होणार असून प्रथम क्रमांकासाठी सोन्याची नथ व पैठणी , द्वितीय क्रमांकासाठी वॉशिंग मशीन तर तृतीय क्रमांकासाठी फ्रिज व सहभागी सर्व महिलांना खास भेटवस्तू तसेच लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे.

'कणकवली श्री ' ही शरीरसौष्ठव स्पर्धा होणार असून पाच गटात घेण्यात येणार आहे. कणकवली नगरपंचायत श्री साठी १०००० रुपये व इतर आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. त्यानंतर राहुल कदम यांची मिमिक्री होईल.

१ फेब्रुवारी रोजी कणकवली शहरातून महोत्सव स्थळापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यावेळी चित्ररथ स्पर्धा ही होणार आहे. त्यांनतर मुख्य रंगमंचावर महोत्सवाचा उद्घाटन सोहळा होईल.

यावेळी माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी दीलिप पांढरपट्टे, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, स्वाभिमान पक्ष जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत व सुप्रसिधद सिनेस्टार सोनू सूद उपस्थित राहणार आहेत. तसेच यावेळी कणकवली शहराच्या जडणघडणीत महत्वपूर्ण योगदान दिलेल्या व्यक्तींचा सत्कारही केला जाणार आहे. त्यांनतर स्थानिक कलाकारांचा नृत्य, नाट्य, संगीत असा विविधांगी ' कनक कला कल्प' हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.

२ फेब्रुवारी रोजी 'ब्युटी क्वीन व मिस्टर हँडसम स्पर्धा ' होईल. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकासाठी १००००रुपये , द्वितीय क्रमांकासाठी ७०००रुपये, तृतीय क्रमांकासाठी ५००० रुपये व सर्व विजेत्यांना ' क्राऊन' देण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या वेळी नंदिता राणे यांनी प्रमुख उपस्थिती असणार आहे.

त्यांनतर 'कॉमेडीचा जल्लोष' हा कार्यक्रम होईल. यामध्ये भूषण कडू, माधवी जुवेकर, प्रभाकर मोरे, कीशोरी आंबिये, दिगँबर नाईक, जयवन्त भालेकर, कमलाकर सातपुते, प्रणव रावराणे, आनंद कारेकर, निखिल राणे, रवींद्र खोमणे, अंजली सावन्त हे कलाकार उपस्थित रहाणार आहेत.

3 फेब्रुवारी रोजी महोत्सवाचा समारोप होणार असून माजी मुख्यमंत्री नारायण राणे , माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, स्वाभिमान पक्ष जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, प्रणिता पाताडे व अन्य मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. या कार्यक्रमांचा लाभ रसिकांनी घ्यावा आणि महोत्सव यशस्वी होण्यासाठी सहकार्य करावे. असे आवाहनही समीर नलावडे यांनी यावेळी केले.

संगीतकार अजय- अतुल यांची उपस्थिती !

कणकवली पर्यटन महोत्सवाचे खास आकर्षण म्हणजे उद्घाटन सोहळ्याच्या वेळी सिनेस्टार सोनू सूद उपस्थित राहणार आहे. तर समारोप सोहळ्याच्यावेळी संगीतकार अजय-अतुल यांच्या उपस्थितीत म्युझिकल नाईटचा कार्यक्रम होणार आहे.

पर्यटनाला चालना देण्यासाठी महोत्सव !

पर्यटन दृष्ट्या बहरत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहरात सुद्धा पर्यटनाला चालना मिळावी यासाठी हा महोत्सव आम्ही आयोजित केला आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने विविध खाद्य पदार्थ तसेच इतर वस्तूंचे स्टॉल लावण्यात येणार असून पर्यटकांना मनमुराद खरेदी या ठिकाणी करता येईल, असे यावेळी समीर नलावडे यांनी सांगितले.

 

Web Title: Tourism Festival from 31st January in Kankavli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.