वाफोलीत कार कोसळून अपघात, छत्तीसगडमधील पर्यटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 02:52 PM2020-01-02T14:52:08+5:302020-01-02T14:56:05+5:30

वाफोली धरणानजीक बांदा-दाणोली रस्त्यावर एका वळणावर कार सुमारे आठ फूट खोल दरीत कोसळून अपघात झाला. छत्तीसगड राज्यातील पर्यटक गोव्यात जात असताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले व कार दरीत कोसळली.

Tourists from Chhattisgarh collide with car in Wafoli | वाफोलीत कार कोसळून अपघात, छत्तीसगडमधील पर्यटक

वाफोली धरणानजीक अरुंद रस्ता असल्याने या धोकादायक वळणावर कार अपघातग्रस्त झाली.

Next
ठळक मुद्देवाफोलीत कार कोसळून अपघात, छत्तीसगडमधील पर्यटकगोव्यात जात असताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले

बांदा : वाफोली धरणानजीक बांदा-दाणोली रस्त्यावर एका वळणावर कार सुमारे आठ फूट खोल दरीत कोसळून अपघात झाला. छत्तीसगड राज्यातील पर्यटक गोव्यात जात असताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले व कार दरीत कोसळली.

मात्र, कारमधील एअरबॅग्ज ऐनवेळी उघडल्याने कोणालाही गंभीर इजा झाली नाही. कारमधील पाचही प्रवासी सुखरुप आहेत. कारचे दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वाफोलीचे सामाजिक कार्यकर्ते विनेश गवस व मित्रमंडळाने पर्यटकांना सहकार्य केले. हा अपघात मंगळवारी सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास झाला.


या मार्गातून रहदारीही मोठ्या प्रमाणात असल्याने लहान-मोठ्या अपघातांची मालिकाच सुरू आहे. यापूर्वी रात्रीच्या सुमारात दहाच्यावर अपघात झाले आहेत. एक महिन्यापूर्वी याच वळणावर जेसीबी दुसऱ्या वाहनाला बाजू देत असताना उलटून अपघातग्रस्त झाला होता. ंयामध्ये काही प्रवासी जखमी झाले होत.


दिवस-रात्र पर्यटक याच मार्गावरून आंबोली, गोव्यात जात-येत असतात. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात रहदारी सुरू असते. तसेच एसटी आणि अवजड वाहनांची वाहतूकही या मार्गावरून होत असते. याबाबत संबंधित विभागाने या वळणावर लवकरात लवकर उपाययोजना करणे आवश्यक आहे.

तसेच या वळणावर सुरक्षिततेचे उपाय म्हणून रस्त्यावरून वाहनांना सतर्कतेसाठी बाजूला फलक लावणे गरजेचे आहे. दोन्ही बाजूंनी झुडपे वाढली आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूंनी येणाºया वाहनचालकांना समोरून येणारी वाहने दृष्टीस पडत नाहीत. त्यामुळे या वळणावर सातत्याने अपघात होत असतात.


सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार कळवूनही झुडपे तोडण्याची कार्यवाही केलेली नाही. यासाठी लवकरच लाक्षणिक उपोषण छेडण्याचा इशारा विनेश गवस यांनी दिला आहे.
 

Web Title: Tourists from Chhattisgarh collide with car in Wafoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.