फोंडाघाट, दाजीपुरात पर्यटकांची रिघ

By admin | Published: July 9, 2016 11:33 PM2016-07-09T23:33:43+5:302016-07-10T01:43:20+5:30

वर्षा पर्यटन : अनेकजण घेताहेत सुट्टीचा आनंद; दोन्ही घाटातील धबधबे फेसाळले

Tourists in Fondaghat, Dajipur | फोंडाघाट, दाजीपुरात पर्यटकांची रिघ

फोंडाघाट, दाजीपुरात पर्यटकांची रिघ

Next

निकेत पावसकर--  नांदगाव --कोकणातील अनेक ठिकाणी पावसाळ्यात वर्षा पर्यटनासाठी अप्रतिम स्थळे असून निसर्गनिर्मित असल्याने त्यात वेगळीच निसर्गाच्या कलाकृतीची झालर पहायला मिळते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने अनेकजण सुट्टीचा आनंद अशा विविध निसर्गनिर्मित पर्यटनस्थळी घेताना दिसतात. फोंडाघाटातून जाताना आणि दाजीपूर या ठिकाणी पर्यटकांची रिघ लागलेली दिसते.
कणकवली तालुक्यातील फोंडाघाट बाजारपेठ सोडल्यावर अवघ्या काही अंतरावर हिरव्यागार गर्द झाडीत, मंद वारा आणि धुके यामधून झुळझुळ वाहणारे उंच कड्यावरून पडणारे तुषार असे अप्रतिम चित्र पहायला आणि अनुभवायला मिळते. यामुळे घाट परिसर वर्षा पर्यटनासाठी जणूकाही नटलेला दिसतो. फोंडाघाटच्या माथ्यावर एका ठिकाणी सिमेंट बंधारा बांधण्यात आला असून तो उंचावर असल्याने त्यावरून पडणारे पाणी धबधब्याचे नेत्रसुख देते. खाली फेसाळणारे पाणी नक्कीच आपल्याकडे खेचताना दिसते. यामुळे आपसूक येथून प्रवास करणारे पर्यटक व खास वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या मंडळींच्या नजरा या धबधब्याकडे वळतात. यामुळे सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे आंबोली, बावडा घाटाबरोबर फोंडाघाटही सध्या वर्षा पर्यटनासाठी आकर्षक ठरत आहे.
सध्या फोंडाघाटात कड्याकपाऱ्यातून उंचावर पडणारे तुषार झेलल्यानंतर पर्यटकांची पावले पुढे दाजीपूर अभयारण्याकडील ४ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या धबधब्याकडे वळतात. फोंडाघाटानंतर पर्यटक पुढे दाजीपूर येथील धबधब्याला पसंती देत आहेत. सगळीकडे सुन्न परिसर, शांती शितल वारा, उंचावरून पडणारे धबधब्याच्या पाण्याचा आवाज आवाज असा परिसर दाजीपूर येथील धबधब्याचा असून देवगड निपाणी राज्यमार्गावरून जाताना घाट संपल्यानंतर काहीच अंतरावर दाजीपूर स्टॅँडजवळून आतमध्ये ४ किलोमीटरवर असणाऱ्या धबधब्याकडे पर्यटकांची पावले सध्या वळताना दिसत आहेत.
फोंडाघाट संपल्यानंतर असणारी स्वागताची कमान ज्या ठिकाणी आहे त्याच्याच बाजूला थोडा अंतर डोंगर चढल्यानंतर तेथून वरती गेल्यानंतर एक लोखंडी टॉवर बांधला असून यावरून आपणास संपूर्ण फोंडाघाट तसेच त्याच्या परिसरातील गावे, घरे व अवघड वळणाची वाट काढत जाणारी वाहने पाहताना डोळ्याचे पारणे फिटते. सोसाट्याचा वारा व निसर्ग सौंदर्य पाहताना एक वेगळीच अनुभूती येते. असा हा वर्षा पर्यटनासाठी सध्या फोंडाघाट सज्ज असून सध्या पर्यटकांची पसंती बनला आहे. भविष्यात जिल्ह्यातील आंबोली, सावडाव या ठिंकाणी होणारी गर्दी पाहता बरेचजण फोंडाघाटकडे वळताना दिसत आहेत.


निसर्गाच्या सानिध्यात आस्वाद
शांत, शितल असे उंचावरून पडणारे पाणी पाहता यावे असा निसर्गाचा आविष्कार देखणे रूप असून त्याच्या सौंदर्याची भुरळ सध्या सर्वांनाच पडताना दिसत आहे. काही ठिकाणी तर पर्यटकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून यावर पर्यटक वर्षा पर्यटनाचा आस्वाद घेताना दिसत आहेत. आपण बनवून आणलेल्या विविध पदार्थांची रेलचेल सध्या फोंडाघाट परिसरात पर्यटक या निसर्गाच्या सानिध्यात आस्वाद घेताना आढळतात. वर्षा पर्यटनासाठी सुरक्षित असे ठिकाण सध्या फोंडाघाट परिसर परिचित असून यामुळे दिवसेंदिवस पर्यटकांचा ओढा वाढताना दिसत आहे.

निसर्गाच्या सानिध्यात आस्वाद
शांत, शितल असे उंचावरून पडणारे पाणी पाहता यावे असा निसर्गाचा आविष्कार देखणे रूप असून त्याच्या सौंदर्याची भुरळ सध्या सर्वांनाच पडताना दिसत आहे. काही ठिकाणी तर पर्यटकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून यावर पर्यटक वर्षा पर्यटनाचा आस्वाद घेताना दिसत आहेत. आपण बनवून आणलेल्या विविध पदार्थांची रेलचेल सध्या फोंडाघाट परिसरात पर्यटक या निसर्गाच्या सानिध्यात आस्वाद घेताना आढळतात. वर्षा पर्यटनासाठी सुरक्षित असे ठिकाण सध्या फोंडाघाट परिसर परिचित असून यामुळे दिवसेंदिवस पर्यटकांचा ओढा वाढताना दिसत आहे.

Web Title: Tourists in Fondaghat, Dajipur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.