व्यावसायिकांच्या पदरी निराशा, पारंपरिक मच्छिमारांचे मुदतपूर्वच पॅकप  सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 06:58 PM2020-04-28T18:58:52+5:302020-04-28T19:03:08+5:30

यंदाचा मत्स्य हंगाम पारंपरिक रापण आणि गिलनेटधारक मच्छिमारांसाठी अतिशय चिंताजनक गेला आहे. मत्स्य हंगामाच्या सुरुवातीला वादळी वाऱ्यांनी जोर केला. आॅक्टोबरमध्ये ह्यक्यारह्ण वादळामुळे अनेक मच्छिमारांचे नुकसान झाले. मासेमारीही ठप्प राहिली.

Traditional fishermen start premature packing | व्यावसायिकांच्या पदरी निराशा, पारंपरिक मच्छिमारांचे मुदतपूर्वच पॅकप  सुरू

मालवण दांडी किनारी मत्स्य दुष्काळामुळे पारंपरिक गिलनेटधारक न्हैय व्यावसायिकांनी जाळी उतरवून आवराआवर सुरू केली आहे.

googlenewsNext
ठळक मुद्दे शासनाकडे मत्स्य दुष्काळाची मागणी वारंवार करूनदेखील मत्स्य दुष्काळ शासनाच्या लालफितीतील कारभारात अडकलेला आहे.

मालवण : मत्स्य हंगामाच्या सुरुवातीपासून अरबी समुद्रात सातत्याने निर्माण झालेली वादळे आणि त्यानंतर परराज्यातील हायस्पीड नौका तसेच एलईडी पर्ससीनची बेकायदेशीर मासेमारी यामुळे मत्स्य दुष्काळात होरपळलेल्या पारंपरिक गिलनेट प्रकारातील ह्यन्हयह्ण व्यावसायिकांनी दीड महिनाअगोदरच पॅकअप सुरू केले आहे.

यंदाचा मत्स्य हंगाम पारंपरिक रापण आणि गिलनेटधारक मच्छिमारांसाठी अतिशय चिंताजनक गेला आहे. मत्स्य हंगामाच्या सुरुवातीला वादळी वाऱ्यांनी जोर केला. आॅक्टोबरमध्ये ह्यक्यारह्ण वादळामुळे अनेक मच्छिमारांचे नुकसान झाले. मासेमारीही ठप्प राहिली. त्यानंतर सुरू झालेल्या मत्स्य हंगामात ह्यएलईडी पर्ससीनवाले आणि परराज्यातील हायस्पीडवाले तुपाशी अन् पारंपरिक उपाशीह्ण अशी स्थिती राहिली. केंद्र व राज्यातील सरकारला एलईडी मासेमारीवरील बंदीची कडक अंमलबजावणी करता आली नाही. परिणामत: रापण व गिलनेटधारक पारंपरिक मच्छिमारांना मासे मिळायचे बंद झाले. पारंपरिक मासेमारीचे दिवसही घटले.

मत्स्य दुष्काळामुळे एकप्रकारे अघोषित मासेमारी बंदी पारंपरिक मच्छिमारांवर ओढवली. दुसरीकडे एलईडी पर्ससीनवाल्यांची बेकायदेशीर मासेमारी मात्र सुरूच राहिली. त्याला वेसण घालण्यात शासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी अपयशी ठरले. शासनाकडे मत्स्य दुष्काळाची मागणी वारंवार करूनदेखील मत्स्य दुष्काळ शासनाच्या लालफितीतील कारभारात अडकलेला आहे.

नौकांच्या अतिक्रमणामुळे मच्छिमार हैराण!

शासनाचा नाकर्तेपणा आणि मत्स्य दुष्काळाला कंटाळून गिलनेटधारक न्हैय व्यावसायिकांनी मुदतपूर्वच आपला गाशा गुंडाळायला सुरुवात केली आहे. न्हैयवाले मच्छिमार पंधरा वावापासून ४५ वावापर्यंत मासेमारीस जातात. परंतु राज्याच्या सागरी हद्दीत परराज्यातील शेकडो हायस्पीड नौका दिवसरात्र अतिक्रमण करून स्थानिक न्हैय व्यावसायिकांना हैराण करतात. त्यांची जाळीसुद्धा तोडून नेतात. यावर्षी अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. यासंदर्भात पोलिसांत तक्रारी दाखल झाल्या आहेत. एलईडी पर्ससीनवाले न्हैयवाल्यांचे प्रमुख कॅच असलेली सुरमई मोठ्या प्रमाणात पकडतात. त्यामुळे न्हैयवाल्यांना इंधन खर्च सुटेल एवढेसुद्धा मासे मिळत नाहीत. या साºयाला कंटाळून न्हैयवाल्या पारंपरिक मच्छिमारांनी मान्सूनच्या आगमनाच्या दीड महिना अगोदरच आवराआवर सुरू केली आहे. मालवणसह जिल्ह्यात ठिकठिकाणी न्हैय व्यावसायिक आपली जाळी उतरवून फायबर बल्याव किनाºयावर घेत आहेत.

 

Web Title: Traditional fishermen start premature packing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.