मठ मार्गावरील वाहतूक ठप्प

By admin | Published: July 17, 2016 11:41 PM2016-07-17T23:41:36+5:302016-07-17T23:49:09+5:30

आकेशियाचे झाड कोसळले : वीज खांबाच्या तारा तुटून नुकसान

Traffic jam on the Math Road | मठ मार्गावरील वाहतूक ठप्प

मठ मार्गावरील वाहतूक ठप्प

Next

वेंगुर्ले : वेंगुर्ले-मठ मार्गावर बोवलेकरवाडी येथे रविवारी आकेशियाचे झाड रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. तसेच वीज खांबाच्या तारा तुटून नुकसान झाले.
वेंगुर्ले-मठ मार्गावर बोवलेकरवाडी येथे सकाळी ८.३० च्या सुमारास रस्त्यालगत असलेले आकाशीचे भले मोठे झाड विजेच्या तारांवर पडून रस्त्यावर कोसळले. त्यामुळे सुमारे एक तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. आकाशीचे झाड विजेच्या तारांवर कोसळल्याने तारा तुटून तसेच काही विद्युत पोलही वाकल्याने वीज मंडळाचे नुकसान झाले. कुडाळहून वेंगुर्लेकडे येणाऱ्या बस गाड्या वेतोरे येथून खानोली-दाभोली मार्गे वेंगुर्ले येथे वळविण्यात आल्या.
झाड पडल्याचे वृत्त समजताच वायरमन दिलीप कावले, बांधकाम स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक यशवंत कांडरकर यांच्यासह बांधकाम कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. सरपंच नित्यानंद शेणई, सत्यवान बोवलेकर, मनोहर बोवलेकर, भाऊ बोवलेकर, ज्ञानेभर बोवलेकर, रघुवीर बोवलेकर, महेश सावंत, मनीष बोवलेकर, भूषण बोवलेकर, उत्तम बोवलेकर, वासुदेव बोवलेकर या ग्रामस्थांनी त्वरित झाड बाजूला करुन मार्ग वाहतूकीस मोकळा केला. (प्रतिनिधी)
 

Web Title: Traffic jam on the Math Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.