फ्रेंच पेटांक खेळाचे मठ येथे ४० प्रशिक्षणार्थिंना प्रशिक्षण, सिंधुदुर्ग जिल्हा पेटांक असोसिएशनची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 04:30 PM2017-12-01T16:30:27+5:302017-12-01T16:37:17+5:30
मठ येथील डॉ. रा. धों. खानोलकर हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पेटांक खेळाच्या प्रशिक्षणाचा शुभारंभ सरपंच तुळशीदास ठाकूर यांच्या हस्ते झाला. मिलिंद क्षीरसागर यांनी सहभागी झालेल्या ४० प्रशिक्षणार्थिंना पेटांकचे प्रशिक्षण दिले. पेटांक हा फ्रेंच खेळ असून, भारतात तो गोट्यांच्या खेळाच्या स्वरुपात खेळला जातो. हा खेळ मनोरंजनासाठी किंवा वेळ घालविण्यासाठी नसून तो बुद्धीचा खेळ म्हणून खेळला जातो.
वेंगुर्ले : मठ येथील डॉ. रा. धों. खानोलकर हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पेटांक खेळाच्या प्रशिक्षणाचा शुभारंभ सरपंच तुळशीदास ठाकूर यांच्या हस्ते झाला. मिलिंद क्षीरसागर यांनी सहभागी झालेल्या ४० प्रशिक्षणार्थिंना पेटांकचे प्रशिक्षण दिले.
पेटांक हा फ्रेंच खेळ असून, भारतात तो गोट्यांच्या खेळाच्या स्वरुपात खेळला जातो. हा खेळ मनोरंजनासाठी किंवा वेळ घालविण्यासाठी नसून तो बुद्धीचा खेळ म्हणून खेळला जातो. हा खेळा संपूर्ण जिल्हाभर पोहचविण्यासाठी पेटांक खेळाचे केंद्र्र मठ हायस्कूल येथे सुरु करण्यात आले असल्याचे प्रशिक्षक क्षीरसागर यांनी सांगितले.
खेळाच्या शुभारंभप्रसंगी माजी सरपंच स्नेहलता ठाकूर, उपसरपंच नित्यानंद शेणई, मुख्याध्यापक सुनील जाधव, क्रीडा शिक्षक अजित धारगळकर, किशोर सोन्सूरकर, प्रशिक्षक मिलिंद क्षीरसागर, प्रवीण परुळेकर, गिरीश पोईपकर, प्रकाश मठकर, पेटांकचे प्रमुख नीलेश नाईक, गणुराज गोसावी, सागर सोन्सूरकर, राजू मोबारकर, अनिकेत कांबळे, नरेंद्र्र नाईक आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हा पेटांक असोसिएशनची स्थापना करण्यात आली असून, यामध्ये अध्यक्षपदी नीलेश नाईक, उपाध्यक्ष-नित्यानंद शेणई, सचिव-सुनील जाधव, सहसचिव-रमेश वाघमारे, सदस्य-विरेंद्र्र सावंत, अजित धारगळकर, किशोर सोन्सूरकर, अतुल वाढोकार, प्रकाश मठकर, प्रवीण परुळेकर यांचा समावेश आहे.