रत्नागिरीपाठोपाठ चिपळूणमध्येही वाहतूक नियमन
By admin | Published: August 6, 2015 11:38 PM2015-08-06T23:38:38+5:302015-08-06T23:38:38+5:30
लवकरच अमंलबजावणी : वाहतूक कोंडीवर रस्ता वाहतूक समितीच्या बैठकीत नियमावली
चिपळूण : शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी व अपघात टाळण्यासाठी वाहतुकीचे नियमन व्यवस्थितरित्या करता यावे यासाठी नो पार्किंग झोन, पार्किंग झोन, एकदिशा मार्ग, सम व विषम तारखांना पार्किंग, जड वाहनांना ठराविक वेळेत बाजारात प्रवेश वगैरे निर्णय जिल्हाधिकारी तथा रस्ता वाहतूक समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी चिपळूण वाहतूक शाखेच्यावतीने करण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेंद्रसिंग परदेशी यांनी दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी वाहतूक नियमन आदेश जारी केले आहेत. या व्यतिरिक्त रस्ता अगर रस्त्यालगत कोणतेही वाहन पार्क केल्यास शहर वाहतूक पोलिसांमार्फत टोर्इंग करुन नेण्यात येईल. त्या वाहनाच्या मालकावर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. या वाहतूक नियमनानुसार शहरातील एकदिशा मार्गामध्ये पूजा टॉकीजपासून ते गांधी चौक ते नाथ पै चौक ते नाईक कंपनीपर्यंत, नाईक कंपनीपासून ते कोकण मर्कंटाईल बँकेपर्यत, गुहागर नाका ते रंगोबा साबळे मार्ग (अण्णासाहेब खेडेकर संकुलापर्यंत), भेंडीनाक्यापासून ते नाथ पै चौक ते खाटीक आळीपर्यंत, खाटीक आळीपासून ते गाढवतळ मैदानापर्यंत (चष्माघर) असे एक दिशा मार्ग जाहीर करण्यात आले आहेत. शहरातील नो पार्किंगमध्ये नातू बुक स्टॉल ते स्वामी नारायण कॉम्प्लेक्समधील रिबॉक शोरुमपर्यंतच्या जागेत शिवाजी चौक ते बहादूरशेख नाक्यापर्यंत जाणारा रस्ता, मनिषा हॉटेल ते शिवनदी पुलापर्यंतच्या जागेत शिवाजी चौक ते बाजारपेठ अशा जाणाऱ्या रस्त्यालगत या परिसरात होईल. पार्किंगमध्ये स्वामी नारायण कॉम्प्लेक्स आतील व समोरील मोकळी जागा या जागेत, ट्रेड सेंटर कमर्शियल कॉम्प्लेक्स समोरील मोकळया जागेत व लोकमित्र कॉम्प्लेक्ससमोरील मोकळया जागेत, जगताप आरोग्यधाम कमर्शियल कॉम्प्लेक्स (स्टेट बँक आॅफ इंडिया) आतील भागात मोकळ्या जागेत, देसाई प्लाझाच्या आतील समोरील भागात पार्किंग करण्यात यावे. श्री स्वामी कॉम्प्लेक्स ए व बी येथे पर्यायी पार्किंग, कृष्णाजी कॉम्प्लेक्सच्या भागात, अजिंक्य आर्केड भागात, खडस कॉम्प्लेक्ससमोरील बाजूस पार्किंग करण्यात यावे.
शहरातील नो पार्किंगमध्ये काणे हॉटेल ते पाटणकर हॉस्पीटलच्या जागेत शिवाजी चौक ते भोगाळे बस स्टॅण्ड अशा जाणाऱ्या रस्त्यालगत सर्व वाहनांना नो पार्किंग, शिवनदी पूल ते नगर परिषद कंपाऊंड रस्त्यालगत, जिल्हा परिषद शाळा क्र. १ ते पाटणकर हॉस्पीटल समोरील पुलापर्यंतच्या जागेत शिवाजी चौक ते भोगाळे बस स्टॅण्ड अशा जाणाऱ्या रस्त्यालगत (फक्त एस.टी.बसेस त्या ठिकाणच्या बस थांब्यावर थांबतील), चष्माघर ते आराधना मिठाई स्टॉलपर्यंतच्या जागेत रस्त्यालगत तर पार्किंगमध्ये नगर परिषद ते परकार कॉम्प्लेक्सपर्यंतच्या रस्त्यालगत, जुन्या एस.टी. स्टॅण्ड समोरील भाजी मंडईच्या आजूबाजूच्या जागेत, दादर पूल ते कबड्डी मैदानासमोरील आजूबाजूच्या मोकळ्या जागेत (गाढव मैदान) ते शिवनदी पूल या भागात पार्किंग करण्यात यावे.
तसेच नो पार्किंगमध्ये पद्मा चौक ते भारत मोबाईल शॉपीपर्यंतच्या जागेत रस्त्यालगत सर्व वाहनांसाठी नो पार्किंग करण्यात येत आहे. पार्किंगमध्ये शिवनदी पूल ते चष्माघर दरम्यान रस्त्यालगत पार्किंग करण्यात यावे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेंद्रसिंग परदेशी यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)
एकदिशा मार्ग, नो पार्किंग झोन, सम व विषम तारखांना पार्किंग.
रस्त्यालगत वाहन पार्किंग केल्यास टोर्इंग करुन नेणार.
वाहतूक पोलिसांकडून काटेकोर अंमलबजावणी होणार.
अवजड वाहनांना ठराविक वेळीच मिळणार शहरात प्रवेश.
धूमस्टाईल गाड्या चालविणाऱ्यांवर राहणार विशेष लक्ष.
मोबाईलवर बोलणे, दारु पिवून गाडी चालविणाऱ्यांवर होणार कारवाई.
प्रस्तावित प्रवेश बंद ठिकाणे
नाईक कंपनीकडून ते नाथ पै चौक ते गांधी चौक ते पद्मा टॉकिजपर्यंत येणाऱ्या वाहनांना या मुख्य बाजारपेठ मार्गावर.
कोकण मर्कंटाईल बँकेकडून नाईक कंपनीपर्यंत येणाऱ्या वाहनांना .
खाटीक आळीपासून नाथ पै चौक ते भेंडी नाक्यापर्यंत.
गाढवतळ मैदानापासून ते खाटीक आळीपर्यंत प्रवेश बंद करण्यात आला आहे.
पद्मा टॉकिज ते गांधी चौक ते नाथ पै चौक ते नाईक कंपनी या मार्गावर सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत तर सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
सम तारखेला पार्किंगमध्ये पद्मा टॉकिज ते गांधी चौक व गांधी चौक ते नाथ पै चौकपर्यंत रस्त्याच्या लगतच्या उजव्या बाजूकडील जागेत दुचाकी वाहनांना पार्किंग करावे. विषम तारखेला पार्किंगमध्ये पद्मा टॉकिज ते गांधी चौक व गांधी चौक ते नाथ पै चौकपर्यंत रस्त्याच्या लगतच्या डाव्या बाजूकडील जागेत दुचाकी वाहनांना पार्किंग करणे.