बॉक्साइट सदृश्य चिऱ्याच्या भुकटीची वाहतूक, मळेवाड येथे दोन ट्रक ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 06:05 PM2024-04-04T18:05:30+5:302024-04-04T18:05:46+5:30
मळेवाड परिसरात दोन ट्रक पकडण्यात आले या ट्रकमध्ये बॉक्साईट सदृश्य भुकटी असल्याची तक्रार असल्याने हे ट्रक तहसिलदार श्रीधर पाटील यांनी ताब्यात घेतले आहेत. परंतु यात नेमके काय आहे हे तपासणीअंती स्पष्ट होणार आहे.
सावंतवाडी :मळेवाड परिसरात बाॅक्साईट सदृश्य बेकायदा चिऱ्याची भुकटी वाहतूक केल्याप्रकरणी सावंतवाडी तहसील प्रशासनाकडून दोन ट्रक ताब्यात घेण्यात आले आहेत. ही कारवाई बुधवारी रात्री उशिरा करण्यात आली आहे.मात्र या ट्रक नेमके काय होते ते उशिरापर्यंत समजू शकले नव्हते महसूल विभाग याचा तपास करीत आहे.
मळेवाड परिसरात दोन ट्रक पकडण्यात आले या ट्रकमध्ये बॉक्साईट सदृश्य भुकटी असल्याची तक्रार असल्याने हे ट्रक तहसिलदार श्रीधर पाटील यांनी ताब्यात घेतले आहेत. परंतु यात नेमके काय आहे हे तपासणीअंती स्पष्ट होणार आहे. तूर्तास वाहतूक करणारे दोन्ही ट्रक ताब्यात घेण्यात आले आहेत.
गेले काहि दिवस ट्रक मधून चिऱ्याची भुकटी नेली जात आहे. त्यात बॉक्साइटची मात्रा आहे त्यामुळे ती थेट बॉक्साईट म्हणून विकले जात आहे, याबद्दल महसूल व खनीकर्म विभागाकडे तक्रार ही करण्यात आल्या होत्या याची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी त्यांनी मागणी केली आहे.
दोन ट्रक पकडण्यात आल्यानंतर स्वता तहसिलदार पाटील यांनी माहिती घेतली यात मळेवाड, साटेली, सातार्डा या चिरेखणी व मायनिंगही आहे. त्या ठिकाणी असलेल्या मायनिंगच्या मातीत बॉक्साईटचे काही प्रमाण आहे. त्यामुळे शक्यता नाकारता येत नाही.याची आम्ही तपासणी करणार असून नंतरच अधिकची माहिती देण्यात येणार आहे.
ट्रकमध्ये चिऱ्याची भुकटी सदृश्य पावडर
तहसिलदार श्रीधर पाटील यांनी गुरूवारी ट्रक ताब्यात घेतल्यानंतर खात्री केली असता त्यात चिरयाच्या भुकटी सदृश्य पावडर असल्याचे स्पष्ट झाल्याने दोन्ही ट्रक मालकांना नोटीसा बजावण्यात आल्या असून त्याच्याकडून खुलासा मागविण्यात आला आहे.असे तहसिलदार पाटील यांनी स्पष्ट केले.