काळ आला होता पण...,रिक्षावर झाडाची फांदी कोसळली : दोघेजण बालंबाल बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 12:32 PM2020-01-13T12:32:33+5:302020-01-13T12:33:37+5:30
उभादांडा येथील मानसीश्वर पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून बाहेर पडणाऱ्या रिक्षावर बाजूला असलेल्या भल्या मोठ्या आंब्याच्या झाडाची मोठी फांदी तुटून पडल्याने रिक्षाचा चेंदामेंदा झाला. केवळ दैव बलवत्तर म्हणून रिक्षाचालकासह दोघेजण या घटनेतून बालबाल बचावले. मात्र, रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.
वेंगुर्ला : उभादांडा येथील मानसीश्वर पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून बाहेर पडणाऱ्या रिक्षावर बाजूला असलेल्या भल्या मोठ्या आंब्याच्या झाडाची मोठी फांदी तुटून पडल्याने रिक्षाचा चेंदामेंदा झाला. केवळ दैव बलवत्तर म्हणून रिक्षाचालकासह दोघेजण या घटनेतून बालबाल बचावले. मात्र, रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.
सोन्सुरे येथील कृष्णा गडेकर आपल्या रिक्षाने यांचे भाडे घेऊन सकाळी वेंगुर्ला येथे डॉक्टरकडे आले होते. तपासणी झाल्यानंतर ते ग्राहकांना घेऊन शिरोडा येथे निघाले होते. मानसीश्वर येथील पंपाकडे पेट्रोल भरण्यासाठी त्यांनी रिक्षा नेली. पेट्रोल भरून रिक्षा बाहेर काढत असतानाच पंपाशेजारी असलेल्या आंब्याची झाडाची मोठी फांदी तुटून थेट रिक्षावर पडली.
या अपघातात रिक्षाचा पुढील भाग पूर्णता तुटून चेंदामेंदा झाला. यावेळी गडेकर बाजूला सरकल्याने सुदैवाने ते बचावले. तर रिक्षामध्ये मागे बसलेले चिपकर यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांना दवाखान्यात नेऊन उपचार करण्यात आले. काळ आला होता पण वेळ आली नव्हती, याचा प्रत्यय या घटनेने आला. दरम्यान, बाजूला उभ्या असलेल्या दोन दुचाकींचेही या घटनेत मोठे नुकसान झाले आहे.