कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेकडून वृक्षलागवड
By admin | Published: July 2, 2017 05:14 PM2017-07-02T17:14:30+5:302017-07-02T17:14:30+5:30
अखत्यारीतील सर्व संस्थांच्या आवारातील वृक्षगणना करणार : रेश्मा सावंत
आॅनलाईन लोकमत
सिंधुदुर्गनगरी,दि.0२ : शासनाची ४ कोटी वृक्ष लागवड योजना व कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषद सिंधुदुर्गमार्फत वृक्षलागवड मोहिम हाती घेण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्मा सावंत व उपाध्यक्ष रणजीत देसाई यांच्या हस्ते जिल्हा औषध भांडार, जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या आवारात जिल्हास्तरीय वृक्षलागवड मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
या कार्यक्रमास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मारुती कांबळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बालकल्याण रसाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता बागल, लेखाधिकारी कारंडे, जिल्हा आरसीएच अधिकारी संदेश कांबळे, जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांकडील औषध निर्माण अधिकारी, आरोग्य विभागाकडील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
अध्यक्षा रेश्मा सावंत यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आवारात प्रत्येकी किमान २५, आरोग्य उपकेंद्र आवारात जागेच्या उपलब्धतेनुसार किमान ५ व अंगणवाडी केंद्राचे ठिकाणी प्रामुख्याने औषधी वनस्पतींची लागवड करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेमार्फत जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील सर्व संस्था - प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र, ग्रामपंचायत, अंगणवाडी, शाळा, पंचायत समिती इत्यादी येथील वृक्षगणना करण्यात येणार आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राचे ठिकाणी वृक्ष रजिस्टर ठेवण्यात येणार असून पुढील वर्षी नव्याने लागवड केलेल्या वृक्षांची पडताळणी केली जाणार असल्याचे अध्यक्षा सावंत मॅडम यांनी सूचित केले आहे.