बांदा-दोडामार्ग राज्य मार्गावर झाड कोसळले, वाहतूक विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 12:38 PM2022-07-05T12:38:47+5:302022-07-05T12:47:53+5:30

झाड कोसळले त्यावेळी या मार्गावर वाहतूक नसल्याने दुर्घटना टळली.

Trees fell on Banda Dodamarg state highway, disrupting traffic | बांदा-दोडामार्ग राज्य मार्गावर झाड कोसळले, वाहतूक विस्कळीत

बांदा-दोडामार्ग राज्य मार्गावर झाड कोसळले, वाहतूक विस्कळीत

Next

बांदा : बांदा-दोडामार्ग राज्य मार्गावर पानवळ येथे आज, मंगळवारी सकाळी झाड कोसळल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. बांदा पोलीस निरीक्षक शामराव काळे व बांदा तलाठी वर्षा नाडकर्णी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत झाड बाजूला केले. झाड कोसळले त्यावेळी या मार्गावर वाहतूक नसल्याने दुर्घटना टळली.

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार कायम आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात पुराचे पाणी घुसले असून खारेपाटण, बांदा या बाजारपेठांना पुराच्या पाण्याने वेढले आहे. कुडाळ शहरातील आंबेडकर नगर भागात भंगसाळ नदीच्या पुराचे पाणी घुसले आहे.

बांदा शहर व परिसरात कालपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पार्श्वभामीवर नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Trees fell on Banda Dodamarg state highway, disrupting traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.