आरे देवीचीवाडी येथे त्रैेवार्षिक स्नेहसंमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 02:43 PM2019-05-10T14:43:39+5:302019-05-10T14:44:38+5:30
देवगड तालुक्यातील आरे देवीचीवाडी येथील श्री पावणादेवी तरुण सहाय्यक मंडळ, मुंबईच्यावतीने ११ मे रोजी त्रैेवार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. या निमित्ताने रात्री १० वाजता श्री पावणादेवी मंदिराच्या भव्य सभामंडपात तिरंगी भजनाचा सामना होणार आहे.
कणकवली : देवगड तालुक्यातील आरे देवीचीवाडी येथील श्री पावणादेवी तरुण सहाय्यक मंडळ, मुंबईच्यावतीने ११ मे रोजी त्रैेवार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. या निमित्ताने रात्री १० वाजता श्री पावणादेवी मंदिराच्या भव्य सभामंडपात तिरंगी भजनाचा सामना होणार आहे.
श्री पावणादेवी तरुण सहाय्यक मंडळ, मुंबईच्यावतीने देवीच्या वाडीतील ग्रामस्थांच्या विकासाच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून त्रैेवार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन केले जाते. या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने मुंबई, पुणे तसेच जिल्ह्याबाहेर काम धंद्याच्या निमित्ताने असलेले आरे देवीचीवाडी येथील रहिवासी आपल्या कुटुंबियांसह गावात दाखल होत असतात. तसेच आपल्या आप्तस्वकीयांशी हितगुज साधत असतात.
त्रैेवार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने १०मे रोजी सकाळी १० वाजल्यापासून श्री पावणादेवी मंदिराच्या परिसरात सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. तर सायंकाळी ४ वाजता महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ होईल. ११ मे रोजी सकाळी १० वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा, तिर्थप्रसाद, सायंकाळी ६वाजता दिंडी कार्यक्रम, सायंकाळी ७वाजता स्नेह संमेलन व बक्षीस समारंभ ,रात्री १० वाजता तिरंगी भजनाचा सामना होणार आहे. या कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
तिरंगी भजन सामन्याचे आकर्षण !
आरे देवीचीवाडी येथे खुडी येथील श्री भुतेश्वर प्रासादिक भजन मंडळाचे बुवा संतोष जोईल (भजन सम्राट श्रीधर मुणगेकर यांचे शिष्य ) , खांबाळे येथील श्री गावदेवी प्रासादीक भजन मंडळाचे बुवा संजय पवार(भजनसम्राट भगवान लोकरे यांचे शिष्य ), राजापूर ,केळवली येथील गुरुदत्त प्रासादिक भजन मंडळाचे बुवा गणेश जांभळे (भजन सम्राट प्रमोद हर्याण यांचे शिष्य )यांच्यात तिरंगी भजन सामना रंगणार आहे. या तिरंगी भजन सामन्याचे खास आकर्षण भजन रसिकांसाठी आहे.