सिंधुदुर्ग :तिहेरी अपघातात दुचाकीस्वार जागीच गतप्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 11:47 AM2018-12-29T11:47:36+5:302018-12-29T11:51:26+5:30
मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव ओटव फाटा येथे शुक्रवारी सकाळी ७ च्या सुमारास निता व्होल्वो खाजगी आराम बस, आयशर टेंम्पो व दुचाकीस्वार यांच्यात तिहेरी विचित्र अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार जागीच गतप्राण झाला तर आयशर टेम्पो मधील चालकाच्या पायाना गंभीर मार लागल्याने त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले.
सिंधुदुर्ग : मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव ओटव फाटा येथे शुक्रवारी सकाळी ७ च्या सुमारास निता व्होल्वो खाजगी आराम बस, आयशर टेंम्पो व दुचाकीस्वार यांच्यात तिहेरी विचित्र अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार जागीच गतप्राण झाला तर आयशर टेम्पो मधील चालकाच्या पायाना गंभीर मार लागल्याने त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले.
घटनास्थळी नांदगांव ग्रामस्थ तसेच कणकवली पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी, महामार्ग पोलीस यांनी जखमींना हलवण्यात तसेच महामार्ग सुरळीत करण्यास मदत केली. काही काळ महामार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
पुणे येथून सुट्टीनिमित्त गोवा फिरण्यासाठी निता (व्होल्वो) आराम बस गोव्याच्या दिशेने जात असताना मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव ओटव फाटा येथे आली असता सावंतवाडीहून आयशर टेम्पो मुंबईच्या दिशेने जात होता.
या दोन वाहनात भिषण टक्कर होवून अपघात झाला आणि यात टेपोच्या मागोमाग येत असलेला दुचाकीस्वार दीपक जर्नादन राणे (वय ४५ रा. कोळोशी बाजार) हे टेंम्पोच्या खाली सापडून जागीच गतप्राण झाला. तर आयशर चालक जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले.
मृत दुचाकीस्वार दीपक राणे यांच्या पश्चात आई ,पत्नी ३ मुली असा परिवार आहे. तिवरे डामरे येथे त्यांची बाग असल्याने दरदिवशी ते सकाळी पाणी शिंपण्यासाठी जात असत आज ते लवकर पाणी शिंपून परतले असता नांदगाव ओटव फाटा दरम्यान अपघात झाला. नांदगाव व कोळोशी परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
आंदोलनाचा इशारा
महामार्गाच्या चौपदरीकरण कामामुळे सव्हीस रस्ते खड्डेमय व त्यांच्या चुकीमुळेच अपघात घडल्याचे पडसादही नांदगांव ग्रामपंचायतीच्या सभागृहात उमटले. नांदगाव ग्रामस्थ आता आक्रमक झाले असून नांदगांव सरपंच यांनी या साठी ७ जानेवारी रास्ता रोको चा इशारा दिला असून हे आंदोलन नांदगांव तिठा येथे होणार असून नांदगांव परिसरातील जनतेलाही या आंदोलनात सहभागी करून घेणार असल्याचे नांदगांव सरपंच आफ्रोजा नावलेकर यांनी बोलताना सांगीतले.