बचतगटांचे वर्षभरात तिप्पट कर्ज

By admin | Published: March 15, 2015 12:20 AM2015-03-15T00:20:21+5:302015-03-15T00:20:37+5:30

विक्रमी उचल : महिलांच्या धडपडीला कर्जाचा आधार, उत्पादन-विक्रीत भरघोस वाढ

Triple loans in the year to help groups | बचतगटांचे वर्षभरात तिप्पट कर्ज

बचतगटांचे वर्षभरात तिप्पट कर्ज

Next

रहिम दलाल ल्ल रत्नागिरी
महिला बचतगटांनी तयार केलेला माल कोकणरत्न बँ्रडने बाजारात विक्रीसाठी आणण्यात येणार आहे. जिल्ह्यात बचतगटांची आर्थिक उलाढाल वाढत असून, त्यांनी चालू आर्थिक वर्षात ३ कोटी २१ लाख ७५ हजार रुपयांच्या कर्जाची उचल केली आहे. ही कर्जाची उचल गतवर्षीपेक्षा तिप्पट आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात बचतगटांची चळवळ आता चांगली फोफावू लागली आहे. दारिद्रय रेषेखालील महिलांची आर्थिक स्थिती सुधारुन त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी शासनाकडून महिला बचतगटांना आर्थिक मदत करण्यात येत आहे. त्यामुळे आज अनेक महिला बचत गटाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत.
जिल्ह्यात ५२७५ महिला बचत गटांची स्थापना करण्यात आली असून, त्यांची तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे- मंडणगड- २५०, दापोली- ३३०, चिपळूण-५८५, गुहागर- ४९५, खेड- ५९१, संगमेश्वर- ९९६, रत्नागिरी- ७८९, लांजा- ५१९, राजापूर- ७३० अशी आहे. यामध्ये सुमारे ५० हजार महिलांचा समावेश आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला बचत गटांची स्थापना करण्यात आली असली तरी त्यांपैकी आतापर्यंत केवळ १५० बचतगट सक्षमपणे कार्यरत आहेत. हे बचतगट विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करुन त्यांची विक्री करतात. तसेच काही बचतगटाच्या महिला वस्तू, कपडे व अन्य वस्तू तयार करुन त्यांची विक्री करतात.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून महिला बचत गटांना सुरुवातीला खेळते भांडवल म्हणून १५ हजार रुपये देण्यात येतात. ही रक्कम परत न करण्याच्या अटीवरुन आर्थिक मदत म्हणून करण्यात येते. त्यानंतर या बचत गटांना बँकेकडून ५० हजार रुपये ते १० लाख रुपयांपर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येतो. ही माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. पनवेलकर यांनी दिली.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये काम करीत आहे. तर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान रत्नागिरी, लांजा आणि संगमेश्वर यामध्ये कार्यरत आहे. सन २०१३-१४ या आर्थिक वर्षामध्ये महिला बचत गटांनी ८७ लाख रुपये कर्ज घेतले होते. कर्जाची उचल जिल्ह्यातील १०४ महिला बचतगटांनी केली होती. यामध्ये बचतगटांनी जास्तीत जास्त २ लाख रुपयांपर्यंत बचत गटांनी उचल केली होती. त्यांची परतफेडही प्रामाणिकपणे करण्यात येत आहे.
कार्यरत असलेल्या बचतगटांची संख्या वाढत चालली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या बचतगटाच्या माध्यमातून महिलाही स्वत:च्या पायावर उभ्या राहण्यासाठी धडपडत आहेत. कारण चालू आर्थिक वर्षामध्ये कर्ज उचल करण्याऱ्या बचतगटांची संख्या ३५९ झाली आहे. त्यामध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे ३३७ बचतगट आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व्यवस्थापन कक्षाच्या २२ बचत गटांचा समावेश आहे.
३३७ बचत गटांनी ३ कोटी १ लाख ७५ हजार रुपये आणि २२ बचत गटांनी २० लाख रुपये अशा एकूण ३ कोटी २१ लाख ७५ हजार रुपयांच्या कर्जाची उचल केली आहे.
या बचतगटांकडून विविध खाद्यपदार्थ, इतर वस्तू तयार करण्यात येतात. मात्र, या खाद्यपदार्थांचा तयार करण्यात येणाऱ्या इतर वस्तूंचा दर्जा एकसारखाच जपता यावा, बचत गटांचा संघ स्थापन करण्यात येणार आहे.
या संघाच्या माध्यमातून ‘कोकण रत्न’ ब्रँड तयार करण्यात येणार आहे. हा ब्रँड बचतगटांनी तयार केलेल्या मालाच्या विक्रीसाठी वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे बचत गटांनी तयार केलेल्या मालाचा दर्जा सुधारणार आहे. त्यामुळे महिलांची आर्थिक उन्नती होण्यास मोठा आधार लाभणार आहे.

Web Title: Triple loans in the year to help groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.