भुईबावडा घाटात ट्रक दरीत कोसळला; चालक ठार

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: November 2, 2023 10:10 AM2023-11-02T10:10:53+5:302023-11-02T10:12:06+5:30

आज सकाळी ७ वा. च्या सुमारास ही घटना घडली. 

truck falls into valley in bhuibawada ghat driver died | भुईबावडा घाटात ट्रक दरीत कोसळला; चालक ठार

भुईबावडा घाटात ट्रक दरीत कोसळला; चालक ठार

महेश सरनाईक, वैभववाडी (सिंधुदुर्ग) : भुईबावडा घाटात चिऱ्याचा ट्रक जवळपास तीनशे फूट दरीत कोसळला आहे. या अपघातात चालक जागीच ठार झाला आहे. आज सकाळी ७ वा. च्या सुमारास ही घटना घडली. 

पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच सह्याद्री जीव रक्षक करूळ ची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. मृतदेह बाहेर काढण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. रेस्क्यू टीमचे प्रमुख हेमंत पाटील, विजय सावंत, अनिल पाटील, विजय पवार, राजेंद्र वारंग, देवेंद्र पवार, संजय पवार, सुरज शिंदे, वसंत पाटील,पाटील, जितेंद्र पवार जगदीश पाटील सुधीर पवार,कुलदीप सावंत, रवींद्र चव्हाण, रघुनाथ चव्हाण, शुभम माळकर, संकेत पाटील, चंद्रकांत पवार आदी सह्याद्री रक्षक दरीतून मृतदेह बाहेर काढत आहेत. हा अपघात नेमका कशामुळे झाला याबाबतच तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Web Title: truck falls into valley in bhuibawada ghat driver died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात