करुळ घाटात अपघात; टायर फुटल्याने ट्रक टेम्पो ट्रॅव्हलरवर झाला पलटी, १६ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2021 12:02 PM2021-12-17T12:02:00+5:302021-12-17T12:20:28+5:30

करुळ घाटात ट्रकचा टायर फुटून अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.

The truck overturned on the Tempo Traveler due to a flat tire in Karul Ghat | करुळ घाटात अपघात; टायर फुटल्याने ट्रक टेम्पो ट्रॅव्हलरवर झाला पलटी, १६ जण जखमी

करुळ घाटात अपघात; टायर फुटल्याने ट्रक टेम्पो ट्रॅव्हलरवर झाला पलटी, १६ जण जखमी

googlenewsNext

वैभववाडी : करुळ घाटात ट्रकचा टायर फुटून अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात १६ जण किरकोळ जखमी झाले आहेत. रात्री अडीचच्या सुमारास हा अपघात घडला. सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झाली नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूरहून कोकणकडे भूसा भरलेला ट्रक निघाला होता. दरम्यान करुळ घाटात या ट्रकचा टायर फुटला. टायर फुटल्याने हा ट्रक मागून येणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरवर पलटी झाला. यात टेम्पो ट्रव्हलरमधील १६ जण किरकोळ जखमी झाले.

या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यानंतर पोलिसांनी सकाळच्या सुमारास हा ट्रक बाजूला करुन या मार्गावरील वाहतूक एकेरी मार्गाने सुरु केली.

Web Title: The truck overturned on the Tempo Traveler due to a flat tire in Karul Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.