sindhudurg: पिकअप कारची ट्रकला पाठीमागून भीषण धडक, देवगडची महिला जागीच ठार; पती जखमी

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: May 3, 2023 02:04 PM2023-05-03T14:04:02+5:302023-05-03T14:04:35+5:30

आंबे घेऊन देवगडवरून मुंबईला जात असताना झाला भीषण अपघात

Truck-pickup car collision, Devgad woman killed on the spot | sindhudurg: पिकअप कारची ट्रकला पाठीमागून भीषण धडक, देवगडची महिला जागीच ठार; पती जखमी

sindhudurg: पिकअप कारची ट्रकला पाठीमागून भीषण धडक, देवगडची महिला जागीच ठार; पती जखमी

googlenewsNext

देवगड (सिंधुदुर्ग) : मुंबई-गोवा महामार्गावर पेण तालुक्यातील हमरापूर फाटा हद्दीत सिलेंडर वाहून नेणारा गॅस ट्रक (MH-12-EQ-2208) आणि पिकअप (MH-07-AJ-2682)मध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात पिकअप कारमधून प्रवास करणाऱ्या दाम्पत्यापैकी पत्नी जागीच ठार तर पती गंभीर जखमी झाला. स्पृहा खवळे (वय २४) असे मृत महिलेचे नाव आहे.  हमरापूर फाटा ब्रीजवर आज, बुधवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. 

सुमित चंद्रकांत खवळे (२८, रा. देवगड, सिंधुदुर्ग) हे पत्नी स्पृहा यांच्यासह पिकअप टेम्पोमधून आंबे घेऊन देवगडवरून मुंबईला जात होते. दरम्यान, हमरापूर ब्रिजवर त्यांच्या पिकअप कारची गॅस ट्रकला मागून जोरदार बसली. ही धडक इतकी भीषण होती की यात डाव्या बाजूला बसलेल्या स्पृहा खवळे या दोन्ही वाहनांमध्ये चिरडल्या गेल्याने जागीच ठार झाल्या. तर सुमित खवळे हे गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच कल्पेश ठाकूर यांनी जखमींना रुग्णवाहिकेतून तात्काळ पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, महामार्गावर वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. दादर सागरी पोलिस व पेण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही वाहनांना महामार्गावरून बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

Web Title: Truck-pickup car collision, Devgad woman killed on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.