घटना बदलण्याचा प्रयत्न

By admin | Published: November 10, 2015 09:11 PM2015-11-10T21:11:44+5:302015-11-10T23:50:22+5:30

भाई जगताप : महाआघाडीचा मंडणगडात विजय मेळावा

Try to change the event | घटना बदलण्याचा प्रयत्न

घटना बदलण्याचा प्रयत्न

Next

मंडणगड : केंद्र शासनाला सत्तेचा माज आल्याने या देशाची घटना बदलण्याचा प्रयत्न नव्हे; तर संघाकडून त्यांचे प्रारुपही तयार आहे, त्यांना हवा तसा इतिहास लिहिण्याचे काम सुरु आहे, पण या देशातील सर्वधर्म समभावाचा, काँग्रेसी विचार शासनाला हे करण्यापासून रोखणार आहे. बिहारमधील निवडणुकीत परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत. देशातील १३० कोटी जनतेचे भवितव्य जनता स्वत: ठरवेल, असे प्रतिपादन मंडणगड येथील विजय मेळाव्यात काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते भाई जगताप यांनी केले.
नगरपंचायत निवडणुकीत महाआघाआडीला मिळालेल्या निर्भेळ यशानंतर महाआघाडीच्यावतीने मंडणगड येथे आयोजित करण्यात आलेल्या विजय मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून जगताप उपस्थित होते. यावेळी त्यांनी राज्य व केंद्र शासनावर टीका केली. मंडणगड शहरात महाआघाडीने मिळवलेल्या यशाबद्दल आमदार संजय कदम यांचे कौतुक करताना ते म्हणाले की, येथील जनतेची पंचवीस वर्षांची प्रतीक्षा आता संपली आहे. मतदारांना कुणी गृहीत धरु नका, ते हुशार असतात. ते बदलाच्या प्रतीक्षेत होते, आमदारांच्या रुपाने त्यांना योग्य पर्याय सापडल्याने सर्व बंधने झुगारून लोकांनी महाआघाडीला साथ दिली. राज्य व केंद्र शासनाने जनतेचा भ्रमनिरास केला आहे, त्यामुळे जनता त्यांची जागा दाखवून देणार असल्याचेही त्यांनी यावेळी
सांगितले. यावेळी आमदार संजय कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम, जिल्हा परिषद सदस्य अजय बिरवटकर, प्रकाश शिगवण, अस्मिता केंद्रे, स. तु. कदम, रमेश दळवी, जयवंत जालगावकर, भाई पोस्टुरे, वैभव कोकाटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मुश्ताक मिरकर संतोष मांढरे, राजा लेंढे, समद मांडलेकर, रिपाइंचे सिध्दार्थ कासारे, दादासाहेब मर्चंडे, सुभाष तांबे, गणेश रूखे, सखाराम मर्चंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुंझीर दाभीळकर, कादीर बुरोंडकर, संदेश चिले, अनिल रटाटे, अनिल घरटकर, चेतन सातोपे, राकेश साळुंखे, अंकुश सावर्डेकर, गणेश सावर्डेकर, नरेश बैकर, महेश कासारे आदी यावेळी नवनिर्वाचीत नगरसेवकांचा आमदार संजय कदम व भाई जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)

आमदारांचे कौतुक : मंडणगड पॅटर्न राज्यात
आगामी काळात सर्व स्तरातील निवडणुकांमध्ये विजयश्री खेचून आणण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी व रिपाइं महाआघाडीचा मंडणगड पॅटर्न राज्यात सर्वत्र राबवण्याचा मनोदय प्रदेश काँग्रेस प्रवक्ते आमदार भाई जगताप यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी आमदार संजय कदम यांच्या रणनीतीचे कौतुक केले.

आमदारांचे कौतुक : मंडणगड पॅटर्न राज्यात
आगामी काळात सर्व स्तरातील निवडणुकांमध्ये विजयश्री खेचून आणण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी व रिपाइं महाआघाडीचा मंडणगड पॅटर्न राज्यात सर्वत्र राबवण्याचा मनोदय प्रदेश काँग्रेस प्रवक्ते आमदार भाई जगताप यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी आमदार संजय कदम यांच्या रणनीतीचे कौतुक केले.


प्रतीक्षा संपली
मंडणगडमध्ये गेली २५ वर्षे शिवसेनेचे वर्चस्व होते. मात्र, नगरपालिकेच्या निवडणुकीत सेनेचे पानिपत करत जनतेची २५ वर्षांची प्रतीक्षा संपली आहे.


संघाकडून घटना बदलण्याची प्रारूपही तयार आहे.
हवा तसा इतिहास लिहिण्याचे काम सुरू.
राज्य व केंद्र शासनावर जोरदार टीका.
बंधने झुगारून लोकांनी महाआघाडीला दिली साथ.

Web Title: Try to change the event

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.