वाईटपणा नजरेआड करा : मानसी

By admin | Published: January 19, 2015 11:01 PM2015-01-19T23:01:19+5:302015-01-20T00:06:47+5:30

रत्नागिरीत रंगला ‘गमती भविष्याच्या’ कार्यक्रम

Turn aside from evil: Manasi | वाईटपणा नजरेआड करा : मानसी

वाईटपणा नजरेआड करा : मानसी

Next

रत्नागिरी : अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ, रत्नागिरीतर्फे मुंबईच्या ख्यातनाम ज्योतिषी पंडित मानसी यांचा ‘गमती भविष्याच्या’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भगवान परशुराम सभागृहामध्ये हा कार्यक्रम झाला.
मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. तात्यासाहेब अभ्यंकर, उपकार्याध्यक्ष नारायण शेवडे, कार्यवाह राजेंद्र पटवर्धन व पंडित मानसी यांच्या हस्ते भगवान श्री गणेश व भगवान श्री परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन होऊन दीपप्रज्वलन झाले. मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी प्रास्ताविक करुन पं. मानसी यांचा परिचय करुन दिला. याप्रसंगी मंडळाच्या वसतिगृहातील लॉ कॉलेज, गोगटे - जोगळेकर, रत्नागिरी येथे शिक्षण घेत असलेले विद्यार्थी कपील प्रकाश रानडे (वक्तृत्व स्पर्धा प्रथम क्रमांक) व अक्षय संजीव कोकणे (वादविवाद स्पर्धा) विभागीय स्तर रौप्यपदक यांचा सत्कार करण्यात आला.
वाईटातला चांगुलपणा डोळसपणे पाहावा आणि चांगल्यातला वाईटपणा नजरेआड करावा, असा सुखी जीवनाचा मंत्र पं. मानसी यांनी या कार्यक्रमात दिला. बारा राशींच्या गमती जमती सांगताना रास एक असली तरी दोन व्यक्तींमध्ये खूप फरक असतो. ज्योतिष एक शास्त्र आहे. त्याचा मार्गदर्शक म्हणून वापर करा. लोकांनीही आपली मानसिकता बदलली पाहिजे. विनाकारण महागडे विधी, गंडेदोरे, पूजा यांच्या मागे न लागता अत्यंत कमी खर्चात आपणही स्वत: या दोषांचं निराकरण करु शकता. तसेच कालसर्पयोग, पितृदोष, वास्तूदोष, रत्न, एक नाड दोष, मंगळदोष इत्यादीबाबतच्या श्रोत्यांच्या सर्व शंकांना त्यांनी अत्यंत स्पष्ट आणि समर्पक उत्तरे दिली.(प्रतिनिधी)

Web Title: Turn aside from evil: Manasi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.