सिंधुदुर्ग : ...तर राज्यमार्ग बंद करू, स्वाभिमानचा इशारा : आनंदव्हाळ येथे रास्तारोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 01:25 PM2018-08-25T13:25:03+5:302018-08-25T13:27:41+5:30
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या मालवण-कसाल राज्यमार्गाची खड्डे पडून चाळण झाली आहे. याबाबत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने आनंदव्हाळ पुलावर रास्तारोको आंदोलन केले. यावेळी उपविभागीय अभियंता प्रकाश चव्हाण यांना धारेवर धरत पावसाळी डांबराने खड्डे बुजवा, अन्यथा दोन दिवसांत राज्यमार्ग बंद करू, असा इशारा दिला.
मालवण : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या मालवण-कसाल राज्यमार्गाची खड्डे पडून चाळण झाली आहे. याबाबत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने आनंदव्हाळ पुलावर रास्तारोको आंदोलन केले. यावेळी उपविभागीय अभियंता प्रकाश चव्हाण यांना धारेवर धरत पावसाळी डांबराने खड्डे बुजवा, अन्यथा दोन दिवसांत राज्यमार्ग बंद करू, असा इशारा दिला.
आनंदव्हाळ पूल येथे स्वाभिमानच्या पदाधिकाऱ्यांनी रास्तारोको आंदोलन छेडले. यावेळी स्वाभिमानचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, लोकसभा मतदारसंघ उपाध्यक्ष बाबा परब, तालुकाध्यक्ष मंदार केणी, सभापती मनीषा वराडकर, उपसभापती अशोक बागवे, नगरसेवक यतीन खोत, अशोक चव्हाण, रवी टेंबुलकर, महेश जावकर, सतीश आचरेकर, संजय पाताडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मालवण-कसाल राज्य मार्गावरील खड्ड्यांच्या प्रश्नी अशोक सावंत यांनी पदाधिकाऱ्यांसह बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना खड्डेमय रस्त्यांबाबत जाब विचारला. अधिकाऱ्यांनी दोन दिवसांत जांभ्या दगडाचा वापर करून खड्डे बुजविण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी मंदार केणी व यतीन खोत यांनी दगडाने मलमपट्टी नको तर पावसाळी डांबराने खड्डे बुजविले गेले पाहिजेत, असे ठणकावले.