‘तुषार सिंचन निर्वात पंप’ प्रथम

By admin | Published: December 25, 2015 10:55 PM2015-12-25T22:55:33+5:302015-12-25T23:56:41+5:30

निकाल जाहीर : इन्सुली येथील जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन

'Tushar Irrigation Vacuum Pump' First | ‘तुषार सिंचन निर्वात पंप’ प्रथम

‘तुषार सिंचन निर्वात पंप’ प्रथम

Next

बांदा : इन्सुली (ता. सावंतवाडी) येथील नूतन माध्यमिक विद्यालयात पार पडलेल्या ४१ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थी प्रकल्पात मालवण भंडारी हायस्कूलच्या ऋतुजा तुकाराम येवळे हिच्या तुषार सिंचन निर्वात पंप प्रकल्पाने प्रथम क्रमांक पटकाविला. पारितोषिकांचे वितरण शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
विज्ञान प्रदर्शनाचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे- निबंध स्पर्धा प्राथमिक गट (प्रथम तीन क्रमांकानुसार) - मयुरी नितीन पाटील (माध्यमिक विद्यालय, सांगेली), योजना प्रकाश वेंगुर्लेकर (पोईप हायस्कूूल), विनिता मोहन राणे (वि. म. कुंभवडे नंबर १, वैभववाडी). माध्यमिक गट - शर्वरी राजेश पेडणेकर (न्यू. इं. स्कूल, फोंडा, कणकवली), रोशनी गुरुनाथ शेट्ये (शिरगाव हायस्कूल, देवगड), संपदा गणपत गोडे (कलेश्वर विद्यामंदिर, नेरुर, कुडाळ).
विद्यार्थी प्रकल्प - ऋतुजा तुकाराम येवळे (भंडारी हायस्कूल, मालवण, तुषार सिंचन निर्वात पंप), अवनी मकरंद काजरेकर (शिवाजी इंग्लिश स्कूल, जांभवडे, सुपर ड्राय कुलर), गौरव खोचरे (गुरुवर्य अ. वि. बावडेकर विद्यालय, शिरोडा, विद्युत उर्जेचे बचत करणारे उपकरण).
माध्यमिक विद्यार्थी - गौरी मेस्त्री (प्रगत विद्यामंदिर रामगड, मालवण, अष्टपैलू कृषी यंत्र), वैष्णवी वसंत पालव (नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली, पाण्याची पातळी दर्शविणारे उपकरण), प्राजक्ता रविंद्र मुंबरकर (कुणकेश्वर हायस्कूल, देवगड, शेतकऱ्याची बहुपर्यायी काठी).
प्राथमिक शिक्षक शैक्षणिक - सूर्यकांत किशोर साळुंखे (जि. प. शाळा पेंढरी, देवगड, चित्रपट्टीकेच्या सहाय्याने प्रकाशकिरणांचा अभ्यास), एन. एल धामापूरकर (नेमळे पंचक्रोशी, सावंतवाडी, हसत-खेळत जाणूया पचन, श्वसन व रक्ताभिसारण), महेश गावडे (जि. प. शाळा पाट, कुडाळ, आपले शरीर).
माध्यमिक शिक्षक शैक्षणिक - प्रसाद एकनाथ विर्नोडकर (किर्ती विद्यालय, घोडगेवाडी, दोडामार्ग, गणित सूत्र संबोध), पी. जी. काकतकर (माउली विद्यामंदिर सोनुर्ली - सावंतवाडी, बहुुउद्येशीय प्रकाशीय उपकरण), दत्तप्रसाद परुळेकर (चौके हायस्कूल, मालवण, वातावरणीय दाब).
प्राथमिक शिक्षक लोकसंख्या - विनोद मेहतर (जि. प. शाळा कोचरे नंबर २, जागतिक तापमान व समस्या: कारणे आणि उपाय), उदय गोसावी (जि. प. शाळा वालावल, कुुडाळ, आपले आरोग्य आपल्या हाती), जे. डी. पाटील (जि. प. शाळा सासोली -हेदूस, दोडामार्ग, बेटी बचाओ).
माध्यमिक शिक्षक लोकसंख्या- नीलेश मेस्त्री (विजयदुर्ग हायस्कूल, देवगड, स्त्री भु्रणहत्या काल आज आणि उद्या), दिप्ती मोतिराम परब (वेतोरे हायस्कूल, वेंगुर्ले, हसत खेळत लोकसंख्या शिक्षण), आर. जी. पाटील (दाणोली हायस्कूल, सावंतवाडी, सर्प जनजागृती).
प्रयोगशाळा परिचर - रामचंद्र एकनाथ चव्हाण (शिवाजी हायस्कूल, जांभवडे, बायो डिझेल), सहदेव केशव जाधव (नाथ पै ज्ञान प्रबोधिनी, करुळ, कणकवली, प्रयेगशाळेतील टाकाऊपासून उपयुक्त उपकरणे), नंदकिशोर मळेकर (भंडारी हायस्कूल, मालवण, हसत खेळत विज्ञान)
समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती प्रमोद कामत, सचिव सचिन पालव, महादेव गावकर, उल्हास हळदणकर, डी. के. पाटील, अधीक्षक जनार्दन भोसले आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)


वक्तृत्व, निबंध स्पर्धा : श्रेया, प्रियांकाचे यश
वक्तृत्व स्पर्धा प्राथमिक गट - श्रेया उमेश कुलकर्णी (शिरगाव), निर्जरा संजय पाटील (वेंगुर्ले हायस्कूल), रामेश्वरी शशिकांत बोर्डेकर (माउली विद्यामंदिर चेंदवण, कुडाळ). माध्यमिक गट- मंदार दुर्गाराम जोशी (खेमराज इंग्लिश स्कूल, बांदा), सौंदर्या सोनू शेळके (ज्यु. कॉलेज कासार्डे), अक्षया धमेंद्र मोंडकर (वाडा हायस्कूल, देवगड).
प्रश्नमंजूषा स्पर्धा- प्राथमिक गट- प्रियांका प्रमोद दळवी, साक्षी अजित दळवी (कळसुली हायस्कूल, कणकवली). माध्यमिक गट- पूजा शंकर सावंत व रसिका जयानंद सावंत (अणसूरपाल, वेंगुर्ले), तन्मय संतोष पंडित व सोमेश भरत गावडे (एस. एम. हायस्कूल, कणकवली), हर्ष किरण मराठे व दिप्ती गुरुदेव परुळेकर (शेठ ग. म. हायस्कूल, देवगड).

Web Title: 'Tushar Irrigation Vacuum Pump' First

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.