सिंधुदुर्ग : बांदा चेकपोस्टवर दारूसह अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 04:13 PM2018-08-27T16:13:15+5:302018-08-27T16:15:17+5:30

बांदा पोलिसांनी गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीविरोधात गोव्यातून सावंतवाडीत दारुची वाहतूक करताना कारवाई केली. या कारवाईत ८७ हजार रुपयांच्या दारूसह २ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Twenty-two-and-a-half lakh worth of information seized on the Bandra checkpoint | सिंधुदुर्ग : बांदा चेकपोस्टवर दारूसह अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

सिंधुदुर्ग : बांदा चेकपोस्टवर दारूसह अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

Next
ठळक मुद्देबांदा चेकपोस्टवर दारूसह अडीच लाखांचा मुद्देमाल जप्तकारवाईत कार जप्त

बांदा : बांदा पोलिसांनी गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीविरोधात गोव्यातून सावंतवाडीत दारुची वाहतूक करताना कारवाई केली. या कारवाईत ८७ हजार रुपयांच्या दारूसह २ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

बेकायदा दारू वाहतूकप्रकरणी तुषार तुळसकर (२०, रा. सावंतवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दारू वाहतुकीसाठी वापरलेली कार (एमएच-०३; एस-९९१५) जप्त करण्यात आली. ही कारवाई बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बांदा चेकपोस्टवर करण्यात आली.

याबाबत बांदा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बांदा चेकपोस्टवर सहाय्यक निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या उपस्थितीत गोव्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी सुरू होती. शनिवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास गोव्यातून भरधाव येणारी कार तपासणीसाठी थांबविण्यात आली.

कारची तपासणी केली असता आतमध्ये मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीचा दारूसाठा आढळून आला. ८७ हजार रुपयांच्या दारूसह १ लाख ६० हजार रुपयांची कार असा एकूण २ लाख ४७ हजार रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.

बेकायदा दारू वाहतुकीविरोधात तुषार तुळसकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई जयदीप कळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संजय कदम, हेमंत पेडणेकर व विजय जाधव यांनी केली. अधिक तपास बांदा पोलीस करीत आहेत.
 

Web Title: Twenty-two-and-a-half lakh worth of information seized on the Bandra checkpoint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.