सिंधुदुर्ग जिल्ह्यात अडीच लाख तिरंगे फडकणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 03:40 PM2022-08-04T15:40:38+5:302022-08-04T15:41:10+5:30

कणकवली : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने प्रत्येक आस्थापना व घरांवर १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत तिरंगा झेंडा फडकवण्या ...

Two and a half lakh tricolors will be hoisted in Sindhudurg district | सिंधुदुर्ग जिल्ह्यात अडीच लाख तिरंगे फडकणार!

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अडीच लाख तिरंगे फडकणार!

Next

कणकवली : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने प्रत्येक आस्थापना व घरांवर १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत तिरंगा झेंडा फडकवण्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायत व नगरपालिका स्तरावर नियोजन करून ठिकठिकाणी अडीच लाख तिरंगा झेंडे फडकविले जाणार आहेत. सर्वसामान्य जनतेला तिरंगा उपलब्ध व्हावा याकरिताच कणकवली पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात तिरंगा वितरणाच्या स्टॉलचे उद्घाटन करण्यात आल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी दिली.

कणकवली पंचायत समिती कार्यालयामध्ये गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी बोलत होत्या. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार आर.जे.पवार, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सहाय्यक प्रशासन अधिकारी सुगंधा देवरुखकर, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ आदि उपस्थित होते.

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी म्हणाल्या, सिंधुदुर्ग जिल्ह्यात या निमित्ताने विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रेरणेतून शिरोडा, दांडी येथे मिठाचा सत्याग्रह झाला होता. त्या पार्श्वभूमीवर तिथेही विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर जिल्ह्यातील हुतात्मा स्मारक परिसरात स्वच्छता मोहीम घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासोबतच जिल्ह्यात शालेय स्तरावरत देशभक्ती पर गीत गायन स्पर्धा, सायकल रॅलीचे देखील आयोजन करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सहभागी व्हावे.तिरंगा फडकवत असताना प्लास्टिकच्या  तिरंग्याचा वापर करू नये.

प्रशासकीय कार्यालयांसमोरील तिरंगा झेंडा सूर्यास्तापुर्वी उतरवण्याबाबत कार्यवाही केली जाईल. मात्र, घरोघरी फडकविण्यात येणारा तिरंगा १३ ते १५ या कालावधीत दररोज उतरवण्याची गरज नाही. मात्र, तिरंगा उभारताना किंवा उतरवताना ध्वज संहितेचे पालन करावे. ध्वजसंहिते बाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

राजेंद्र दाभाडे म्हणाले, स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना' हर घर तिरंगा' उपक्रमा अंतर्गत तिरंगा झेंड्याची उभारणी करताना काळजीपूर्वक करावी. प्रजीत नायर म्हणाले, ग्रामीण भागात १ लाख ९२ हजार तिरंगा झेंडे वितरणाबाबतचे नियोजन झाले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने १५ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील ३० ग्रामपंचायतना 'हर घर जल' घोषित करण्यात येणार आहे. तर १६७ गाव ओडिएफप्लस घोषित करण्यात येणार आहेत.  देवगड किल्यात सामूहिक राष्ट्रगान उपक्रम राबविला जाणार आहे. शिरोडा येथे महात्मा गांधीजींचे स्मरण करत असताना त्या ठिकाणी वाळू शिल्प पण साकारण्यात येणार आहे.

Web Title: Two and a half lakh tricolors will be hoisted in Sindhudurg district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.