दारू वाहतूक प्रकरणी सोलापूर येथील दोघांना आंबोलीत अटक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 01:18 PM2021-01-04T13:18:37+5:302021-01-04T14:00:55+5:30
liquor ban Amboli hill station Sindhudurg- बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी आंबोली पोलीस दूरक्षेत्र येथे सोलापूर येथील दोघांना अटक करण्यात आली आहे.त्याच्याकडे असलेल्या स्कॉर्पिओ कारसह दारू मिळून तब्बल ९ लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .प्रवीण महावीर बोराडे ( २५ ) व सज्जन बब्रुवान बोराडे ( ४५ ) अशी त्या दोघांची नावे आहेत .
आंबोली : बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी आंबोली पोलीस दूरक्षेत्र येथे सोलापूर येथील दोघांना अटक करण्यात आली आहे.त्याच्याकडे असलेल्या स्कॉर्पिओ कारसह दारू मिळून तब्बल ९ लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .प्रवीण महावीर बोराडे ( २५ ) व सज्जन बब्रुवान बोराडे ( ४५ ) अशी त्या दोघांची नावे आहेत .
याबाबत अधिक माहिती अशी की , गोवा येथून आंबोलीच्या दिशेने बेकायदा दारू वाहतूक होत असल्याची माहिती आंबोली दूर क्षेत्राचे पोलीस हवालदार दत्तात्रय देसाई यांना मिळाली होती . त्यानुसार त्यांनी आपले सहकारी दीपक शिंदे , संदीप गावडे , जिल्हा वाहतूक शाखेचे महेंद्र बांदेकर , विलास नर , आबा पिळणकर यांच्या सहकार्याने सापळा रचला .
त्या दोघांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.त्यांच्याकडे असलेली स्कॉर्पिओ कार व दारूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . ही कारवाई पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली .