दोन दिवस मुसळधार पाऊस, माडखोल धरण झाले ओव्हरफ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 04:51 PM2020-06-15T16:51:15+5:302020-06-15T16:52:23+5:30

सतत पडत असलेल्या पावसामुळे सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणारे माडखोल धरण १०० टक्के भरल्याने पहिल्याच पावसात ते ओव्हरफ्लो झाले. लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सायंकाळी उशिरा या धरणाची पाहणी केली.

Two days of torrential rain, Madkhol dam overflowed | दोन दिवस मुसळधार पाऊस, माडखोल धरण झाले ओव्हरफ्लो

मुसळधार पडलेल्या पहिल्याच पावसामुळे सावंतवाडी तालुक्यातील माडखोल धरण ओव्हरफ्लो झाले. अधिकाऱ्यांनी त्याची पाहणी केली.

googlenewsNext
ठळक मुद्देदोन दिवस मुसळधार पाऊसमाडखोल धरण झाले ओव्हरफ्लो

सावंतवाडी : सतत पडत असलेल्या पावसामुळे सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणारे माडखोल धरण १०० टक्के भरल्याने पहिल्याच पावसात ते ओव्हरफ्लो झाले. लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी या धरणाची पाहणी केली.

तालुक्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत होता. शनिवारी पावसाने थोडी विश्रांती घेतली होती. मात्र, अधूनमधून पाऊस हजेरी लावत आहे.

सावंतवाडी तालुक्यात संततधार पडणाऱ्या पावसाने पडझडीच्या काही घटना घडल्या आहेत. शेतकरी शेतीच्या कामाला लागला आहे. मुसळधार पडलेल्या पहिल्याच पावसामुळे सावंतवाडी तालुक्यातील माडखोल धरण ओव्हरफ्लो झाले. अधिकाऱ्यांनी त्याची पाहणी केली.

Web Title: Two days of torrential rain, Madkhol dam overflowed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.