साडेसात लाखांच्या गुटख्यासह दोघे ताब्यात, स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 08:03 PM2023-09-01T20:03:40+5:302023-09-01T20:03:51+5:30

बांदा, इन्सुली येथील दोघांना घेतले ताब्यात

Two detained with gutka of seven and a half lakhs, local crime investigation action | साडेसात लाखांच्या गुटख्यासह दोघे ताब्यात, स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई

साडेसात लाखांच्या गुटख्यासह दोघे ताब्यात, स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई

googlenewsNext

महेश सरनाईक
 

सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा महामार्गावरून गुटख्याची होत असलेल्या अवैध वाहतुकीवर शुक्रवारी ओरोस येथील जिजामाता चौक येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली. यात ७ लाख ५३ हजार ३८० रुपयांच्या गुटख्यासह १५ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. तसेच अवैध गुटखा वाहतूक प्रकरणी अभय नारायण केसरकर (४३ रा. बांदा) व महादेव सुभाष नेवगी (३३ रा. इन्सुली) यांना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करून अवैध व्यवसायात गुंतलेल्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले आहेत. त्यानुसार या विभागाचे पथक जिल्ह्यात विविध ठिकाणी कारवाई करत आहे. शुक्रवारी पहाटे मुंबई गोवा महामार्गावरून कणकवलीच्या दिशेने अवैध गुटख्याची टेम्पोमधून वाहतूक होणार आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने ओरोस जिजामाता चौक येथे सापळा रचला होता. यावेळी कणकवलीच्या दिशेने जाणारी टेम्पो पीकअप गाडी (एमएच ०७ एजे २८५१) थांबून ती गाडी सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाणे येथे आणून तपासली असता आत ७ लाख ५३ हजार ९८० रुपयांचा गुटखा व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ आढळून आला. त्यामुळे ८ लाख रुपये किमतीचा बोलेरो पिकअप आणि ७,५३,९८० रुपयांचा गुटखा असा एकूण १५ लाख ५३ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बांदा, इन्सुली येथील दोघांना घेतले ताब्यात

गाडी चालक अभय केसरकर (रा. बांदा काळसेवाडी) व महादेव नेवगी (३३ रा. इन्सुली डोववाडी, सावंतवाडी) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम २६ (२) (iv), २७ (३) (डी) (इ) सह वाचन कलम ३० (२) (अ) चा भंग कलम ५९ प्रमाणे सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचा अधिक तपास सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मनीष कोल्हटकर करीत आहेत.

या पथकाने केली कारवाई

स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक महेंद्र घाग, सहा. पोलिस उपनिरीक्षक गुरुनाथ कोयंडे, पोलिस हवालदार प्रकाश कदम, प्रमोद काळसेकर, किरण देसाई, पोलिस शिपाई यशवंत आरमारकर यांचे पथकाने ही कारवाई केली आहे.

Web Title: Two detained with gutka of seven and a half lakhs, local crime investigation action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.