काळ आला होता पण... सावंतवाडीत दोन मुली अपघातातून थोडक्यात बचावल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2018 10:58 PM2018-04-20T22:58:21+5:302018-04-20T22:58:21+5:30

दैव बलवत्तर असेल तर कोणतीही घटना घडो, त्यातून सहीसलामत बाहेर पडणारच. असाच प्रकार शुक्रवारी रात्री सावंतवाडीत अनुभवयास मिळाला.

two girls in Sawantwadi had a brief escape from the accident | काळ आला होता पण... सावंतवाडीत दोन मुली अपघातातून थोडक्यात बचावल्या

काळ आला होता पण... सावंतवाडीत दोन मुली अपघातातून थोडक्यात बचावल्या

Next

 सावंतवाडी  - दैव बलवत्तर असेल तर कोणतीही घटना घडो, त्यातून सहीसलामत बाहेर पडणारच. असाच प्रकार शुक्रवारी रात्री सावंतवाडीत अनुभवयास मिळाला. पोलीस ठाण्याच्या बाजूलाच असलेल्या आंब्याच्या झाडाची एक फांदी विद्युत वाहिन्यांवर कोसळताच सर्व विद्युत वाहिन्याखाली आल्या. त्याच वेळी तेथून दोन छोट्या मुली जात होत्या. त्या तेथेच थांबल्या. मात्र विद्युत वाहिन्या त्यांच्यासमोर पडल्या, पण त्यांना काही झाले नाही आणि त्या थोडक्यात बचावल्या. मात्र ही फांदी पडून दोन दुचाकींचे नुकसान झाले.
सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या समोर आंब्याचे एक झाड आहे. या झाडाच्या काही फांद्या कोरम झाल्या होत्या. त्यातील एक फांदी आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कोसळली. ही फांदी कोसळली ती विद्युत तारांवर. त्यामुळे सर्व विद्युत वाहिन्या खाली आल्या होत्या. त्याच वेळी तेथून शन्वी सुतार व अन्वी सावंत या दोन बालिका जात होत्या. झाडाची फांदी कोसळताच त्या दोन्ही बालिका तेथेच थांबल्या. त्याच वेळी आजूबाजूला मोठी वर्दळ असल्याने या फांद्या मुलींच्या अंगावर पडल्या, असे वाटल्याने सर्वच जण आरडाओरड करू लागले. त्यातच विद्युत वाहिन्यांना चुकून या मुली हात लावतील, अशीही भीती वाटू लागली. पण सुदैवाने असे काही झाले नाही.
या दोन्ही मुली झाडाची फांदी पडताच एका जागेवर शांत उभ्या राहिल्या होत्या. त्याचवेळी तेथे असलेल्या काही पोलिसांनी तसेच पोलीस ठाण्यात आलेल्यांनी या मुलींना बाजूला केले. मात्र झाडाची फांदी कोसळल्याने तेथे लावण्यात आलेल्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. दोन दुचाकी या झाडाच्या खाली अडकून पडल्याचे दिसत होते.
तसेच विद्युत वाहिनी कोसळल्याने पोलीस ठाणे तसेच पोलीस लाईन परिसरातील विद्युत पुरवठाही खंडित झाला होता. पोलिसांनी विद्युत विभागाला माहिती दिल्यानंतर विद्युत विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी विद्युत वाहिन्या बाजूला केल्या होत्या. पण उशिरापर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू होते.

Web Title: two girls in Sawantwadi had a brief escape from the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.