रत्नागिरीत जिल्हा परिषदेचे दोन गट होणार

By Admin | Published: August 29, 2016 12:37 AM2016-08-29T00:37:10+5:302016-08-29T00:37:10+5:30

खेड, चिपळूण स्थिर : संगमेश्वरचा एक गट कमी होणार

Two groups of zonal councils of Ratnagiri | रत्नागिरीत जिल्हा परिषदेचे दोन गट होणार

रत्नागिरीत जिल्हा परिषदेचे दोन गट होणार

googlenewsNext

श्रीकांत चाळके खेड
गेल्या दहा वर्षांत प्रभागनिहाय कमी होत असलेली लोकसंख्या आणि नव्याने निर्माण होत असलेल्या नगरपंचायतीमुळे विभागलेल्या प्रभागाचा फटका जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रभाग रचनेवर झाला आहे़ परिणामी दापोली व मंडणगडसह गुहागर, रत्नागिरी, संगमेश्वर मतदारसंघावर देखील परिणाम झाला असून, खेड आणि चिपळूण मतदारसंघ स्थिर राहिले आहेत़
मंडणगड तालुक्यात याअगोदर जिल्हा परिषदेचे तीन गट होते. ते आता दोन होणार आहेत. तीच स्थिती दापोली तालुक्याची आहे. तेथे यापूर्वी सात गट होते. ते आता सहा राहणार आहेत, तर खेड आणि चिपळूण तालुक्यांतील प्रत्येकी सात आणि नऊ होते, ते तसेच राहणार आहेत. याउलट गुहागर तालुक्यात पूर्वीचे पाच होते, त्याठिकाणी आता चार गट राहणार असून, सगमेश्वर तालुक्यातील पूर्वीच्या आठ गटांचे आता सात गट होणार आहेत़
रत्नागिरी तालुक्याचे मात्र आठ गट कमी न होता दोनने वाढले आहेत. आता रत्नागिरी तालुक्यात दहा गट होणार आहेत. याउलट लांजा आणि राजापूर तालुक्यांत पूर्वीइतकेच म्हणजे अनुक्रमे चार व सहा इतकेच गट राहणार आहेत.
पंचायत समितीमध्ये खेड आणि चिपळूणचे पंचायत समितीचे गण पूर्वीप्रमाणेच म्हणजे अनुक्रमे १४ आणि १८ राहणार आहेत. संगमेश्वर तालुक्यात मात्र पंचायत समिती गणात बदल झाला असून, पूर्वीच्या १६ गणांचे आता १४ मतदारसंघ करण्यात आले आहेत. रत्नागिरीत मात्र १६ गणांचे आता २० गण झाले आहेत. त्यामुळे संगमेश्वर तालुक्याला पूर्वीच्या तुलनेत यापुढे दोन पंचायत समिती सदस्य कमी होणार असून, रत्नागिरी तालुक्याला पूर्वीच्या तुलनेत आणखी चार सदस्य जादा मिळणार आहेत. याप्रमाणेच लांजा व राजापूर तालुक्यांच्या पंचायत समितीच्या पूर्वीच्या सदस्यसंख्येत काही बदल झाला नाही. पूर्वीची असलेली ८ व १२ ही सदस्यसंख्या स्थिर राहणार आहे.
मंडणगड तालुक्याला सहा ऐवजी आता चार मतदारसंघ मिळणार आहेत. गुहागर पंचायत समितीची दहा सदस्य संख्या आता आठ, तर दापोली पंचायत समितीची सदस्य संख्या १२वर आली आहे.

Web Title: Two groups of zonal councils of Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.