दोन शाळकरी मुलींचा मृत्यू, दोघांचे वेगवेगळे आजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 02:09 PM2019-10-07T14:09:52+5:302019-10-07T14:10:54+5:30
कलंबिस्त येथील दोन शाळकरी मुलींचा मागील २४ तासांत वेगवेगळ््या आजारपणात मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. यात गुरूवारी श्रावणी संतोष सावंत हिचा तर शुक्रवारी रिक्षिता दिनेश पास्ते हिचा मृत्यू झाला. रिक्षिताच्या मृत्यूनंतर आज मिलाग्रीस शाळा बंद ठेवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सावंतवाडी : कलंबिस्त येथील दोन शाळकरी मुलींचा मागील २४ तासांत वेगवेगळ््या आजारपणात मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. यात गुरूवारी श्रावणी संतोष सावंत हिचा तर शुक्रवारी रिक्षिता दिनेश पास्ते हिचा मृत्यू झाला. रिक्षिताच्या मृत्यूनंतर आज मिलाग्रीस शाळा बंद ठेवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
श्रावणी सावंत ही गेल्या काही दिवसांपासून आजारी होती. तिच्यावर पुणे येथील मिलट्री रूग्णालयात औषधोपचार सुरू होते. त्यातूनही ती बरी होऊन शाळेत येत होती. मात्र, अचानक चार दिवसांपासून पुन्हा तिची तब्येत बिघडली आणि बांबोळी-गोवा येथे तिचा मृत्यू झाला. श्रावणी ही कळसुकलर हायस्कूलची विद्यार्थिनी होती. ती अभ्यासातही हुशार होती. गुरूवारी तिच्या मृत्यूची बातमी कळताच कळसुलकर हायस्कूल बंद ठेवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
ही घटना ताजी असतानाच कलंबिस्त येथील रिक्षिता दिनेश पास्ते हिचा बांबोळी-गोवा येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. ती मिलाग्रीस हायस्कूलमध्ये नववीमध्ये शिकत होती. तिला काही दिवसांपूर्वी बे्रन ट्युमर झाला होता. तिच्यावर बांबोळी-गोवा येथे उपचारही सुरू होते. त्यातच तिचे आज निधन झाले. रिक्षिताच्या निधनाची बातमी मिळताच मिलाग्रीसमधील तिच्या मैत्रिणींना शोक अनावर झाला होता. या घटनेनंतर मिलाग्रीस शाळा बंद ठेवून रिक्षिताला श्रद्धाजंली अर्पण करण्यात आली.
रितिक्षाचे वडील येथील सावंतवाडी अर्बन बँकेत कार्यरत असून हे कुटुंब पूर्वीपासून सावंतवाडीतच राहते. गेल्या २४ तासांत कलंबिस्तमधील दोन शाळकरी मुलींना वेगवेगळ््या आजारपणात आपला प्राण ग्रमवावा लागल्याने गावातही हळहळ व्यक्त होत आहे.