गडनदीत दोन शाळकरी मुले बुडाली

By admin | Published: June 12, 2017 01:14 AM2017-06-12T01:14:53+5:302017-06-12T01:14:53+5:30

एकाचा मृत्यू

Two schoolgirls lost their lives in Kathmandu | गडनदीत दोन शाळकरी मुले बुडाली

गडनदीत दोन शाळकरी मुले बुडाली

Next

कणकवली : कणकवली शहरातील दोन विद्यार्थी आशिये-ब्राह्मणवाडी येथे गडनदी पात्रात शनिवारी सायंकाळी आंघोळीसाठी गेले होते. आंघोळ करताना पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघेही बुडाले. बुडालेल्यांपैकी रामचंद्र दीपक माणगावकर याचा मृतदेह गोपुरी आश्रमाच्या पाठीमागील बाजूस आढळला. तर प्रसन्नजित कुंभवडेकर याचा मृतदेह शोधण्याचे काम रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
याबाबतची माहिती अशी की, प्रसन्नजित सुमंगल कुंभवडेकर (१६, रा. कुडाळकर निवास, आचरा रोड-कणकवली) व रामचंद्र दीपक माणगावकर (१४, रा. मसुरकर किनई रोड, कणकवली) हे दोन शाळकरी मुलगे शनिवार १० जून रोजी सायंकाळी ४ वाजता घरातून बाहेर पडून गडनदी पात्रात आंघोळीसाठी गेले होते. प्रसन्नजितने भगव्या रंगाचे टी शर्ट, निळ्या रंगाची हाफ पँट घातली होती, तर रामचंद्रने टी शर्ट व बर्मुडा घातला होता.
शनिवारी सायंकाळी ७ वाजल्यानंतर प्रसन्नजित नेहमीप्रमाणे घरी न आल्यामुळे त्याच्या आई-वडिलांनी त्याचे मित्र हर्षद, किरण व करण यांच्याकडे फोनद्वारे चौकशी केली. मात्र प्रसन्नजित आपल्याकडे आला नसल्याचे त्याच्या मित्रांनी सांगितले.
त्यानंतर प्रसन्नजितची आई सुकन्या व वडील सुमंगल कुंभवडेकर यांना दीपक माणगावकर भेटले. त्यांच्याजवळ प्रसन्नजितची चौकशी केली असता दीपक माणगावकर यांनी आपला मुलगा रामचंद्रही बेपत्ता असल्याचे सांगितले. या बेपत्ता दोन शाळकरी मुलांचा शोध घेऊनही ते न सापडल्यामुळे रात्री १ वाजता प्रसन्नजित व रामचंद्र बेपत्ता असल्याची तक्रार प्रसन्नजितची आई सुकन्या सुमंगल कुंभवडेकर यांनी कणकवली पोलीस स्थानकात दिली.
प्रसन्नजित व रामचंद्रच्या नातेवाईकांनी, ग्रामस्थांनी, पोलिसांनी तसेच आपत्ती निवारण कक्षातर्फे वागदे तलाठी शरद शिरसाट व कलमठ तलाठी राहुल निग्रे यांनी गडनदी पात्रात शोधमोहीम सुरू केली. प्रसन्नजित व रामचंद्र नेमके कुठे गेले हे कुणालाच सुरुवातीला माहिती नव्हते. मात्र प्लास्टिक पिशवी घेऊन ते टी शर्ट व बर्मुडावर गेल्यामुळे ते आंघोळीला गेले असावेत, असा अंदाज करून नातेवाईकांनी गडनदी पात्रात शोधमोहीम सुरू केली.
या शोध मोहिमेसाठी आमदार नीतेश राणे यांची खासगी बोट, एक दोरी, जॅकेट व रिंग असे सामान वापरण्यात आले. पाऊस सुरू असल्यामुळे गडनदी पात्रात गढूळ पाणी आहे. त्यामुळे शोधमोहिमेत अडथळे येत होते. सायंकाळी दोन पाणबुडे आल्यानंतर पाणबुड्याद्वारे शोधमोहीम हाती घेण्यात आली. अखेरीस पाणबुड्याला सायंकाळी ७ च्या सुमारास रामचंद्र माणगावकरचा मृतदेह गोपुरी आश्रमाच्या पाठीमागील बाजूस गडनदी पात्रात सापडला.
प्रसन्नजित कुंभवडेकरने अंबरनाथ येथे दहावीची परीक्षा दिली होती, तर रामचंद्र माणगावकर हा उर्सुला इंग्लिश स्कूलमध्ये शिकत होता. रात्री उशिरापर्यंत प्रसन्नजितचा शोध घेण्याचे काम सुरू होते.
दोघेही एकुलते एक
बुडालेले दोघेही शाळकरी मुलगे आईवडिलांचे एकुलते एक होते. रामचंद्र माणगावकरची आई पिग्मी एजंट असून वडील टेम्पोचालक आहेत. त्यांना सर्व मुलीच असून रामचंद्र हा एकुलता एक मुलगा होता, तर प्रसन्नजीतला तीन बहिणी असून तोही आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. या दुर्घटनेमुळे माणगावकर व कुंभवडेकर या दोन्ही कुटुंबांवर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. रामचंद्र माणगावकरचा मृतदेह सापडल्याचे त्याच्या आईला समजताच आईने हंबरडा फोडला. एकुलता एक मुलगा गमावल्यामुळे आई-वडिलांच्या दु:खाला पारावार उरला नाही.

Web Title: Two schoolgirls lost their lives in Kathmandu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.