दोन जागा काँग्रेसकडे, एक शिवसेनेकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2015 11:50 PM2015-08-03T23:50:18+5:302015-08-04T00:03:50+5:30

भिरवंडे, गांधीनगर, तोंडवली बावशी निवडणूक : प्राजक्ता कदम, मनिषा सावंत, सुप्रिया रांबाडे सरपंचपदी

Two seats to the Congress, one Shiv Sena | दोन जागा काँग्रेसकडे, एक शिवसेनेकडे

दोन जागा काँग्रेसकडे, एक शिवसेनेकडे

Next

कनेडी/नांदगांव : भिरवंडे आणि गांधीनगर ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडणुकीत सरपंचपदी दोन्हीही महिला विराजमान झाल्या आहेत. भिरवंडे सरपंचपदी प्राजक्ता भगवान कदम तर गांधीनगर सरपंचपदी मनिषा दीपक सावंत यांची वर्णी लागली आहे. या निवडणुका सोमवारी घेण्यात आल्या. दोन्ही ग्रामपंचायती काँग्रेसप्रणित आहेत. तर तोंडवली-बावशी ग्रुप ग्रामपंचायतीवर एप्रिल महिन्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेने वर्चस्व मिळविल्यानंतर सोमवारी झालेल्या निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत सुप्रिया रांबाडे व उपसरपंच कौस्तुभ नाडकर्णी यांची बिनविरोध निवड केली.भिरवंडे, गांधीनगर ग्रामपंचायत निवडणुकीत भिरवंडे बिनविरोध तर गांधीनगर गुप्त मतदान पद्धतीने सरपंच निवडणूक झाली. भिरवंडे सरपंचपदी प्राजक्ता कदम तर उपसरपंचपदी मिलिंद सावंत यांची वर्णी लागली. गांधीनगर सरपंचपदी मनिषा सावंत तर उपसरपंचपदी अस्मिता सावंत यांची वर्णी लागली. दोन्ही सरपंच, उपसरपंच यांचे स्वागत सतीश सावंत यांनी केले.
तोंडवली-बावशी ग्रुप ग्रामपंचायतीच्या एप्रिल महिन्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेने सहा जागांवर विजय मिळविला होता. यावेळी राष्ट्रवादीचे अनंत बोभाटे अवघ्या एका मताने निवडून आले होते. याचवेळी या ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकणार असा शिक्कामोर्तब झाला होता. याच झालेल्या निवडणुकीनंतर सोमवारी झालेल्या नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी राखीव असणाऱ्या सरपंच पदासाठी सुप्रिया रांबाडे व उपसरपंच कौस्तुभ नाडकर्णी या दोन शिवसेना पुरस्कृत उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यानंतर झालेल्या निवडीत सुप्रिया रांबाडे यांची सरपंच म्हणून व कौस्तुभ नाडकर्णी यांची उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.
यावेळी विद्यमान नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांना शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य दीपक कांडर, सोनाली शिंदे, निता ईस्वलकर, अंकिता कुडतरकर, माजी सरपंच उमेश कुडतरकर, अतुल सदडेकर, सुरेश रांबाडे, सुभाष नार्वेकर, चंद्रकांत बोभाटे, बाळा नाडकर्णी, तात्या निकम, देवेंद्र बोभाटे, जीजी खडपे, आनंद गुरव, प्रकाश मेस्त्री यांनी स्वागत केले.
निवडणूक अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी ममता तांबे, ग्रामसेवक प्रशांत वर्दम यांनी काम पाहिले. (वार्ताहर)

Web Title: Two seats to the Congress, one Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.