रिक्षा पलटी झाल्याने दोघी बहिणी गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 11:27 AM2022-03-22T11:27:53+5:302022-03-22T11:29:31+5:30
समोरून डंपर आल्याने रिक्षा बाजूला घेण्याच्या प्रयत्नात रिक्षा पलटी झाली.
कणकवली : समोरून डंपर आल्याने रिक्षा बाजूला घेण्याच्या प्रयत्नात रिक्षा पलटी झाली. या अपघातात दोन सख्ख्या बहिणी गंभीर जखमी झाल्या आहेत. नम्रता घाडीगावकर व निकिता घाडीगावकर अशी जखमी झालेल्या दोघींची नावे आहेत. हळवल रस्त्यावरील चढावा नजीकच्या वळणावर हा अपघात झाला.
जखमी दोघींना तातडीने कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अधिक उपचारासाठी गोव्याला हलविण्यात येणार आहे.
सध्या एसटी बंद असल्याने कणकवलीला कळसुली गावकरवाडी येथील नम्रता घाडीगावकर व निकिता घाडीगावकर या रिक्षाने येत होत्या. हळवल रस्त्यावरील चढावा नजीकच्या वळणावर हा अपघात झाला. यात एकीच्या पायाला तर दुसरीच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे.
अपघाताची माहिती मिळताच माजी जिल्हापरिषद अध्यक्षा संजना सावंत, पंचायत समितीचे माजी उपसभापती मिलिंद मेस्त्री, वागदेचे माजी सरपंच संदीप सावंत, संदीप मेस्त्री, संदीप सावंत, सुशांत दळवी, सचिन पारधिये, श्यामसुंदर दळवी, आनंद घाडीगावकर, कान्हा मालंडकर आदींनी रुग्णालयात धाव घेतली होती. तसेच जखमींची विचारपूस केली.