रानडुकरांच्या शिकारप्रकरणी दोन संशयित ताब्यात; वनविभागाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 10:05 PM2019-11-28T22:05:37+5:302019-11-28T22:05:45+5:30

एका गावात रानडुकरांची शिकार करून त्यांच्या मटणाचे भाग करताना व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला

Two suspects in custody for wild boar hunt; Forest Department action | रानडुकरांच्या शिकारप्रकरणी दोन संशयित ताब्यात; वनविभागाची कारवाई

रानडुकरांच्या शिकारप्रकरणी दोन संशयित ताब्यात; वनविभागाची कारवाई

Next

मालवण : तालुक्यातील एका गावात रानडुकरांची शिकार करून त्यांच्या मटणाचे भाग करताना व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून याची गंभीर दखल आज वनविभागाने घेत दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.  त्यांना न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. यात अनेकांचा सहभाग असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
गेले दोन दिवस रानडुकरांची शिकार करून त्यांच्या मटणाचे भाग केले जात असल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर फिरत असल्याचे दिसून आले. याची कोणतीही तक्रार झालेली नाही. मात्र वनविभागाने याची गंभीर दखल घेत नाना नेरकर, सुरेश मापारी या दोन संशयितांना आज पहाटेच राहत्या घरातून ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. त्यांना येथील न्यायालयात हजर केले जाणार आहे. प्रत्यक्षात त्या व्हिडीओमध्ये अनेकांचा सहभाग असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रानडुकरांच्या शिकारीचा बनविलेला व्हिडीओ त्यांच्याच अंगलट आला असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Two suspects in custody for wild boar hunt; Forest Department action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.