मराठा क्रांती मोर्चाच्या जागृतीसाठी सिंधुदुर्गात दुचाकी रॅली
By admin | Published: October 14, 2016 09:27 PM2016-10-14T21:27:33+5:302016-10-14T21:27:33+5:30
कणकवली तालुका मराठा समाजाच्यावतीने 19 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
कणकवली, दि. १४ - ओरोस येथे 23 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चाच्या जनजागृतीसाठी कणकवली तालुका मराठा समाजाच्यावतीने 19 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. नांदगाव ते कणकवली शहरमार्गे ओसरगाव पर्यंत ही दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे. अशी माहिती मराठा समाज बांधवांच्यावतीने देण्यात आली.
येथील पटवर्धन चौकातील कणकवली तालुका मराठा क्रांती मोर्चा संपर्क कार्यालयात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी सुशील सावंत, सोनू सावंत, बबलू सावंत, किशोर राणे, शेखर राणे, सुभाष राणे, बच्चू प्रभूगावकर, हरीश पाटील, महेंद्र सांब्रेकर, नीलम सावंत, तेजल लिंग्रज , श्वेता सावंत, रती पाटील, रुपाली चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते.
मराठा मोर्चाच्या अनुषंगाने तालुक्यातील मराठा समाज बांधवाना संपर्क करण्यात येत आहे. त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद लाभत आहे. या मोर्चाबरोबरच समाजात जागृती व्हावी यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून 19 ऑक्टोबर रोजी कणकवली तालुक्यातील मराठा समाज बांधवांच्यावतीने दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे.
या रॅलीत महिलांसह युवक तसेच युवती बहुसंख्येने सहभागी होणार आहेत. तालुक्यातील प्रत्येक गावातून किमान 50 दुचाकी स्वार सहभागी होतील. शेकडो मोटारसायकलचा ताफा ही या रॅलीत असणार आहे. असे सांगतानाच जास्तीत जास्त मराठा समाज बांधवानी या रॅलीत सहभागी व्हावे तसेच रॅलीच्या अधिक माहितीसाठी उन्मेष राणे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन ही यावेळी संयोजकांच्यावतीने करण्यात आले.