वेंगुर्ला-कुडाळ मार्गावर दुचाकी-रिक्षाची समोरासमोर धडक, चौघे गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 11:57 AM2022-05-26T11:57:38+5:302022-05-26T12:36:30+5:30

अपघातात गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून या घटनेची नोंद वेंगुर्ले पोलीस ठाण्यात झाली आहे

Two wheeler rickshaw collided head on on Vengurla Kudal road | वेंगुर्ला-कुडाळ मार्गावर दुचाकी-रिक्षाची समोरासमोर धडक, चौघे गंभीर जखमी

वेंगुर्ला-कुडाळ मार्गावर दुचाकी-रिक्षाची समोरासमोर धडक, चौघे गंभीर जखमी

Next

वेंगुर्ला : वेंगुर्ला ते कुडाळ कडे जाणाऱ्या रोडवर मठ पेट्रोलपंपाजवळ दुचाकी व रिक्षाची समोरासमोर धडक झाली. या अपघातात चौघे गंभीर जखमी झाले. अपघातात गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून या घटनेची नोंद वेंगुर्ले पोलीस ठाण्यात झाली आहे. हा अपघात काल, बुधवारी रात्री उशिरा झाला.

दुचाकीस्वार सलमान शौकत शेख, रिक्षा चालक राजन परब, रुपाली राजन परब, (४७), व बहीण स्नेहलता गावडे (५८) अशी गंभीर जखमीची नावे आहेत. जखमींवर गोवा बांबुळी येथील तर वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या अपघाताबाबत रूपाली परब यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आम्ही रामघाट रोड वेंगुर्ला, येथील राजन परब हे चालवित असलेल्या तीन चाकी रिक्षा क्र (एम.एच-०७-सी-३९६८) या रिक्षाने वेंगुर्ला रामघाट रोड येथे येत होतो. त्याच दरम्यान कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गोंदयाळवाडी येथील दुचाकीस्वार सलमान शौकत शेख याच्या दुचाकीने क्रमांक (एम.एच-०७-ए.एल-२२०४) रिक्षाला समोरून जोराची धडक दिली.

अपघाताची माहिती मिळताच मठ ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात हलविले. दरम्यान परब यांच्या तक्रारी वरून वेंगुर्ले पोलिस ठाण्यात भा. द.वी कलम २७९, ३७, ३३८, मोटर वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Read in English

Web Title: Two wheeler rickshaw collided head on on Vengurla Kudal road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.