नांदगाव येथे अपघातात दुचाकी स्वार गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 13:43 IST2021-05-06T13:42:05+5:302021-05-06T13:43:25+5:30
Accidenet Kankvali Sindhudurg : मुंबई - गोवा महामार्गावर कणकवली तालुक्यातील नांदगाव कोळंबा मंदिर समोर गुरुवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास दुचाकी व चारचाकी यांच्यात अपघात झाला . या अपघातात दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाली आहे.

नांदगाव येथे अपघातात दुचाकी स्वार गंभीर जखमी
कणकवली : मुंबई - गोवा महामार्गावरकणकवली तालुक्यातील नांदगाव कोळंबा मंदिर समोर गुरुवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास दुचाकी व चारचाकी यांच्यात अपघात झाला . या अपघातात दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाली आहे.
हा अपघात महामार्ग चौपदरीकरण करणाऱ्या ठेकेदार कंपनीने उड्डाणपुलावरून दोन्ही बाजूने अचानक वाहने सुरू केल्याने व एका बाजूला सर्व्हिस रोड नसल्याने विरुध्द दिशेने वाहन हाकताना झाला आहे.
मुंबईहून गोव्याच्या दिशेने कार घेऊन चालक जात होता. त्याचवेळी कणकवलीहून वैभववाडीपर्यंत दुचाकी घेऊन सुनील शिंगाडे हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा कर्मचारी जात होता. यावेळी कार व दुचाकी यांच्यात धडक होऊन अपघात झाला.
या अपघातात दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाली असून घटनास्थळी तातडीने दाखल झालेल्या वाहतूक पोलीस चंद्रकांत गावकर आणि झरकर यांनी उपचारासाठी त्वरित नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.तेथून १०८ रुग्णवाहिकेतून ओरोस येथे अधिक उपचारासाठी त्याला नेण्यात आले.