आंबोली घाटात ट्रक खाली चिरडून दुचाकीस्वार ठार, ओव्हरटेक करताना घडली दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 11:42 AM2022-05-25T11:42:06+5:302022-05-25T11:48:48+5:30

हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीस्वाराच्या शरीराचे दोन तुकडे झाले.

two-wheeler was killed after being crushed under a truck In Amboli Ghat | आंबोली घाटात ट्रक खाली चिरडून दुचाकीस्वार ठार, ओव्हरटेक करताना घडली दुर्घटना

आंबोली घाटात ट्रक खाली चिरडून दुचाकीस्वार ठार, ओव्हरटेक करताना घडली दुर्घटना

Next

आंबोली : ओव्हरटेक करताना समोरच्या गाडीचा अंदाज न आल्यामुळे झालेल्या अपघातात ट्रकच्या चाकाखाली चिरडून दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीस्वाराच्या शरीराचे दोन तुकडे झाले. तर त्याच्यासोबत असलेला मित्र गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात काल, मंगळवारी रात्री उशिरा आंबोली नाना पाणी वळणावर घडला.

समीर शशिकांत जाधव (रा. वेताळ-बांबर्डे ता. कुडाळ) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत मुबारक हुसेन शेख (रा. चंदगड) या चालकाने दिलेल्या तक्रारीनुसार आंबोली पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की, शेख हे आपल्या ताब्यातील ट्रक घेऊन रात्रीच्या सुमारास कोल्हापूरच्या दिशेने जात होते. यावेळी समोरून भरधाव आणि चुकीच्या दिशेने येणाऱ्या जाधव याचा गाडीवरील ताबा सुटून तो थेट ट्रकच्या खाली आला. यावेळी दुचाकीस्वार ट्रकच्या चाकाखाली चिरडला गेला.

दरम्यान अपघाताची माहिती मिळताच आंबोली पोलिस ठाण्याचे हवालदार दत्ता देसाई व कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. तर जखमी असलेल्या सहकाऱ्याला अधिक उपचारासाठी सावंतवाडी कुटीर रुग्णालयात हलविले.

Web Title: two-wheeler was killed after being crushed under a truck In Amboli Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.