कणकवली येथे केटी बंधाऱ्यावरून दोन युवती नदी पात्रात कोसळल्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 03:51 PM2020-10-30T15:51:16+5:302020-10-30T15:52:41+5:30
कणकवली येथील मराठा मंडळ नजीक गड नदीवरील केटी बांधाऱ्यावर दोन दुचाकीमध्ये अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोन युवती थेट नदीत २० फूट खाली कोसळल्या . त्यांना किरकोळ दुखापत झाली असून येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. गेल्या पंधरा दिवसांतील या केटी बांधाऱ्यावरील हा दुसरा अपघात आहे.
कणकवली : कणकवली येथील मराठा मंडळ नजीक गड नदीवरील केटी बांधाऱ्यावर दोन दुचाकीमध्ये अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोन युवती थेट नदीत २० फूट खाली कोसळल्या . त्यांना किरकोळ दुखापत झाली असून येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. गेल्या पंधरा दिवसांतील या केटी बांधाऱ्यावरील हा दुसरा अपघात आहे.
कणकवली येथील एक युवती आपल्या मैत्रिणी समवेत मालवणला जात होती. मराठा मंडळ येथील केटी बंधाऱ्यावरुन दुचाकी घेऊन ती निघाली होती. तेवढ्यात ओसरगाव येथून कणकवलीकडे येणाऱ्या एका दुचाकी स्वाराची धडक त्यांच्या दुचाकीला बसली. हा अपघात साधारणतः शुक्रवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास घडला.
या अपघातात दुचाकीवरील दोन्ही युवती थेट नदीत कोसळल्या.
यापैकी एक युवती कणकवली शहरातील असून दुसरी तिची नातेवाईक असल्याचे समजते. यावेळी बाळू पारकर , दामोदर सावंत, बंटी मेस्त्री तसेच अन्य नागरिकांनी त्यांना मदत केली. यावेळी महेश लक्ष्मण घाडीगावकर, राजन परब, चेतन मुंज, अण्णा कोदे, उत्तम राणे, वालावलकर, सापळे आदी नागरिक उपस्थित होते. त्या किरकोळ जखमी झालेल्या युवतींना उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.