Sindhudurg: तारकर्ली येथे पर्यटनासाठी आलेल्या पुण्यातील दोन युवकांचा बुडून मृत्यू

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: February 22, 2025 15:27 IST2025-02-22T15:25:11+5:302025-02-22T15:27:58+5:30

मालवण: पुणे हडपसर येथून तारकर्ली येथे पर्यटनासाठी आलेल्या दोन युवकांचा समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. रोहित बाळासाहेब ...

Two youths from Pune who came for tourism in Tarkarli drowned | Sindhudurg: तारकर्ली येथे पर्यटनासाठी आलेल्या पुण्यातील दोन युवकांचा बुडून मृत्यू

Sindhudurg: तारकर्ली येथे पर्यटनासाठी आलेल्या पुण्यातील दोन युवकांचा बुडून मृत्यू

मालवण: पुणे हडपसर येथून तारकर्ली येथे पर्यटनासाठी आलेल्या दोन युवकांचा समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. रोहित बाळासाहेब कोळी (वय २१), शुभम सुनील सोनवणे (२२) अशी मृतांची नावे आहेत. तर कुश संतोष गदरे (२१), रोहन रामदास डोंबाळे (२०), ओंकार अशोक भोसले (२४) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  ही घटना आज, शनिवारी सकाळच्या सुमारास तारकर्ली एमटीडीसी जवळील समुद्रकिनाऱ्यावर घडली. 

हवेली तालुक्यातील कुश गदरे, रोहन डोंबाळे, ओंकार भोसले, रोहित कोळी, शुभम सोनवणे हे युवक मालवण तारकर्ली येथे पर्यटनासाठी आले होते. सकाळच्या सुमारास हे युवक समुद्र स्नानासाठी पाण्यात उतरले होते. यावेळी अचानक पाण्याच्या खोलीचा व लाटांचा अंदाज न आल्यामुळे पोहत असलेल्या युवकांपैकी ओंकार भोसले, रोहित कोळी, शुभम सोनवणे हे युवक पाण्यात ओढले गेले. किनारावरील स्थानिकांनी तसेच पर्यटन व्यवसायिकांनी तात्काळ बचाव कार्य सुरू केले. बोटीच्या सहाय्याने बुडालेल्या युवकांचा पाण्यात शोध कार्य सुरू करण्यात आले. अखेर स्थानिकांकडून समुद्राच्या पाण्यात शोधकार्य सुरू असताना बुडालेल्या अवस्थेत तीनही युवक सापडून आले. 

त्यांना तात्काळ रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान डॉक्टर आणि तपासणी केली असता रोहित कोळी व शुभम सोनवणे यांना मयत घोषित केले. ओंकार भोसले हा अत्यवस्थ असून त्याच्यावर अधिक उपचारासाठी त्याला खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. बचाव कार्यात समीर गोवेकर, वैभव सावंत, दत्तराज चव्हाण, महेंद्र चव्हाण, रांजेश्वर वॉटर स्पोर्टचे कर्मचारी सामील होते. याप्रकरणी मालवण पोलिस तपास करीत आहेत.

Web Title: Two youths from Pune who came for tourism in Tarkarli drowned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.