आंबोलीत बांधकाम व्यावसायिकाला दागिन्यांसह लुटण्याचा प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 02:50 PM2019-05-17T14:50:21+5:302019-05-17T14:51:49+5:30
सावंतवाडी येथील एका बांधकाम व्यावसायिकाला पुण्यावरून सावंतवाडीच्या दिशेने येत असताना आंबोली येथे चार ते पाच जणांनी अपघाताचा बहाणा करून लुटल्याची घटना घडली आहे. त्यांच्याकडे असलेल्या दागिन्यांसह पैसे घेऊन अज्ञात चोरट्यांनी पलायन केले. हा प्रकार बुधवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास आंबोली घाटातील नानापाणीजवळ घडला.
आंबोली : सावंतवाडी येथील एका बांधकाम व्यावसायिकाला पुण्यावरून सावंतवाडीच्या दिशेने येत असताना आंबोली येथे चार ते पाच जणांनी अपघाताचा बहाणा करून लुटल्याची घटना घडली आहे. त्यांच्याकडे असलेल्या दागिन्यांसह पैसे घेऊन अज्ञात चोरट्यांनी पलायन केले. हा प्रकार बुधवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास आंबोली घाटातील नानापाणीजवळ घडला.
ते व्यावसायिक आपल्या घरातील नातेवाईकांसह पुणे येथे फिरण्यासाठी गेले होते. तेथून परतत असताना आंबोली येथे नानापाणी वळणावर झालेल्या एका अपघातामुळे तेथे वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे त्यांनी आपली गाडी थांबवून अपघाताची माहिती घेत असताना मागून भरधाव येणाऱ्या एका कर्नाटक पासिंग डंपरने त्यांच्या कारला मागून धडक दिली. अपघाताचा आवाज येताच त्यांनी त्यांना विचारणा करण्यासाठी त्या ठिकाणी धाव घेतली.
यावेळी कारमधील दोघांनी ह्यत्याह्ण व्यावसायिकाच्या गाडीची चावी काढून घेण्याचा प्रयत्न केला. तर अन्य तिघांनी त्यांच्या गळ््यात व हातात असलेले सोन्याचे दागिने खेचून घेतले व डंपर घेऊन तेथून पलायन केले. यावेळी ते व्यावसायिक हे कुटुंबासमवेत असल्यामुळे तसेच परिसरात रेंज नसल्यामुळे तेथे फोन करू शकले नाहीत. सायंकाळी उशिरा त्यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली असून, अज्ञात चोरट्यांच्या विरोधात तक्रार दिली. गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.
दरम्यान, सायंकाळी उशिरा स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष संजू परब यानी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपींचा तातडीने शोध घेण्याची मागणी केली होती. हे प्रकरण उशिरापर्यंत सुरू होते.
आंबोली घाटातील सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह
मंगळवारी इचलकरंजी येथील एका व्यावसायिकाला पाच जणांनी पिस्तुलाचा धाक दाखवून लुटल्याची घटना ताजी असताना बुधवारी घडलेल्या या घटनेमुळे आंबोली घाटातील सुरक्षितेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.