बालकल्याण विभागाने प्रस्ताव गायब केल्याचा प्रकार बालकल्याण समिती सभेत उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 12:08 PM2019-02-16T12:08:59+5:302019-02-16T12:11:24+5:30
२०१७-१८ या आर्थिक वर्षात विशेष घटक योजनेअंतर्गत घरघंटी मिळावी यासाठी दोडामार्ग तालुक्यातून आलेले दोन प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाने गायब केल्याचा प्रकार झालेल्या महिला व बाल कल्याण समिती सभेत उघड झाले आहे. याबाबत सदस्या संपदा देसाई यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत अधिकारी यांना धारेवर धरले.
ओरोस : २०१७-१८ या आर्थिक वर्षात विशेष घटक योजनेअंतर्गत घरघंटी मिळावी यासाठी दोडामार्ग तालुक्यातून आलेले दोन प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाने गायब केल्याचा प्रकार झालेल्या महिला व बाल कल्याण समिती सभेत उघड झाले आहे. याबाबत सदस्या संपदा देसाई यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत अधिकारी यांना धारेवर धरले.
बै नाथ पै सभागृहात सभापती पल्लवी राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला प्रभारी महिला व बाल कल्याण अधिकारी प्रणयकुमार चटलवार, सदस्य शवार्णी गांवकर, माधुरी बांदेकर, राजलक्ष्मी डीचवलकर, वर्षा कुडाळकर, पल्लवी झिमाळ, श्वेता कोरगांवकर, संपदा देसाई यांच्यासह अधिकारी खातेप्रमुख उपस्थित होते.
२०१७-१८ चे विशेष घटक योजनेचे प्रस्ताव तांत्रिक मान्यता देऊन पुणे येथील कार्यालय येथे पाठविले असल्याचे सांगत त्याचे वाचन करण्यात आले. मात्र, यात सदस्या देसाई यांचे दोन प्रस्ताव नसल्याचे निष्पन्न झाले. त्यावेळी देसाई यांनी आपण परिपूर्ण प्रस्ताव पाठविले होते.
याबाबत मी प्रत्येक सभेत आठवण करीत होतो. तरीही माझेच प्रस्ताव गायब झाल्याबाबत आश्चर्य व्यक्त केले. दरम्यान यावेळी दोडामार्ग प्रकल्प अधिकारी म्हणाले आम्ही तालुक्यातून परिपूर्ण प्रस्ताव पाठविल्याचे सांगितले.
माझे तालुक्यातील दोन प्रस्तावच कसे मागे राहिले आहे असा आरोप करत अधिकारी वर्गाला सभेमध्ये धारेवर धरले. यावेळी सभापती पल्लवी राऊळ यांनी अधिकारी यांना सूचना देत जिल्हा कार्यालयात या प्रस्तावांचा शोध घ्यावा, असे आदेश दिले .