शिवराजेश्वर मंदिराला उद्धव ठाकरेंच्या हस्ते सिंहासन अर्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 11:51 AM2024-02-05T11:51:28+5:302024-02-05T11:51:56+5:30
संदीप बोडवे मालवण : छत्रपतींना साजेसे असे सिंहासन मिळाले आहे. ज्या शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले, त्या महाराजांना नवे ...
संदीप बोडवे
मालवण : छत्रपतींना साजेसे असे सिंहासन मिळाले आहे. ज्या शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले, त्या महाराजांना नवे वैभव प्राप्त झाले आहे. महाराजांना साजेसे असे सिंहासन आमच्या वैभव नाईक यांनी उपलब्ध करून दिले त्याबद्दल त्यांचे कौतुकच आहे, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. शिवसेनेच्या वतीने सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदिरात दगडी सिंहासन तयार करण्यात आले होते. या सिंहासनाचे पूजन आणि अर्पण सोहळा रविवारी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.
वैभव तुझ्यावर जनतेचा विश्वास
मालवण बंदरजेटीवरील सभेप्रसंगी उद्धव ठाकरेंनी आमदार वैभव नाईक यांच्या पाठीवर थाप दिली. जर जनता एकवटली तर गुंडागर्दी नेस्तनाबूत करू शकते, हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने मागील काही निवडणुकीत वैभव नाईक व विनायक राऊत यांच्या विजयानंतर दाखवून दिले आहे. त्यामुळे वैभव तुझ्यावर जनतेचा विश्वास आहे, ‘तू पुन्हा लढ’ असा आशीर्वाद ठाकरे यांनी नाईक यांना दिला.
यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार भास्कर जाधव, वरुण सरदेसाई, मिलिंद नार्वेकर, माजी महापौर दत्ता दळवी, रुची राऊत, गितेश राऊत, रमेश कोरगावकर, संदेश पारकर, अरुण दुधवडकर, अतुल रावराणे, हरी खोबरेकर, यतीन खोत, बाळा गावडे, सरपंच भगवान मंदार, मंदार ओरसकर, गणेश कुडाळकर, उमेश मांजरेकर, निनाक्षी शिंदे, श्वेता सावंत, पूनम चव्हाण, सेजल परब, सुर्वी लोणे, माधुरी प्रभू, तपस्वी अंजना, अंजना सामंत, भारती आडकर, स्नेहा शेलटकर विनायक कोळंबकर, मंगेश सावंत यांच्यासह शिवसेनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.