‘त्या’ वादावर अखेर तोडगा

By admin | Published: September 28, 2016 11:34 PM2016-09-28T23:34:33+5:302016-09-28T23:59:07+5:30

महादेवाचे केरवडेमध्ये बैठक : गावकरी-मानकऱ्यात सामंजस्याचा निर्णय

Ultimately, the 'ultimate problem' will be resolved | ‘त्या’ वादावर अखेर तोडगा

‘त्या’ वादावर अखेर तोडगा

Next

माणगाव : महादेवाचे केरवडे येथील मानकरी, गावकरी व ग्रामस्थ यांच्यातील वादावर अखेर समन्वय बैठकीतून तोडगा काढण्यात आला.  यापुढे ज्या गावकरी मंडळींना ग्रामदेवतेच्या देवळात नारळ फोडणे, भटजी येण्याबाबत आडकाठी न आणणे व वैयक्तिक वादापोटी एखाद्याला वाळीत टाकणे हे प्रकार थांबविण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी सामंजस्यपूर्वक मते मांडल्याने बैठक उत्साहात पार पडून गावाच्या समृद्ध वाटचालीस नवी सुरूवात झाल्याची मते व्यक्त करण्यात आली. महादेवाचे केरवडे मालाचीराई येथील कविटकर-सावंत आदी ग्रामस्थांनी पोलिसांकडे आपले नारळ ग्रामदेवतेच्या देवळात ठेवू न देणे, आपल्याकडे लग्नसमारंभासाठी आडकाठी आणणे व वैयक्तिक वादापोटी एखाद्याकडे इतरांनाही जाण्यास मज्जाव करणे आदी बाबतीत निवेदन दिले होते. या नियोजनाची दखल घेऊन गावातील समझोता व गाव एक संघ राहण्याच्या दृष्टीने अ‍ॅड. किशोर शिरोडकर, सरपंच पंढरीनाथ परब, माजी सरपंच बाळ केसरकर, अ‍ॅड. चंद्रशेखर परब आदींनी बुधवारी समन्वयाची बैठक घेतली.
ही बैठक महादेवाचे केरवडे ग्रामदैवत श्री रवळनाथ पावणाई मंदिरात पार पडली. या बैठकीस सावंतवाडीचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रविण चिंचाळकर, कुडाळ पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा, माणगावचे साहायक पोलिस उपनिरीक्षक चव्हाण यांसह पंढरीनाथ परब, अ‍ॅड. किशोर शिरोडकर, बाळ केसरकर, मधुकर परब, मंगेश परब, राजन सावंत, विजय म्हाडगूत, राजू कविटकर आदींसह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रत्येकाने आपला हक्क व कर्तव्य पार पाडताना इतरांना त्रास होईल असे वर्तन न करण्याबाबत एकमत झाले. ज्या लोकांच्या तक्रारी होत्या, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचे नारळ ठेवणे, लग्न समारंभ आदीबाबतीत मानकरी लागतील, तशी पूर्वकल्पना मानकऱ्यांना द्यावी. नारळ ठेवायचा असल्यास तशीही कल्पना द्यावी. असे यावेळी ठरविण्यात आले.
सण समारंभात देवळात सर्व ग्रामस्थांचे नारळ ठेवणे, गाऱ्हाणी करण्याबाबत समन्वय तोडगा काढण्यात आला. यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त करण्यात
आले. (प्रतिनिधी)


हेवाळेकर प्रकरणाची पुनरावृत्ती नको
महादेवाचे केरवडे येथील ग्रामदेवतेच्या देवळात काही ग्रामस्थांचे नारळ ठेवले जात नसल्याबाबत तक्रार हेवाळेकर प्रकरणाशी सर्व केरवडेवासीयांचा काही संबंध नसून, या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात गावाची बदनामी झाली. याची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून घेण्यात आलेल्या समन्वयक बैठकीत अशा प्रकरणाची पुनरावृत्ती होणार नसल्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.
गावाच्या समृद्ध वाटचालीची सुरूवात
महादेवाचे केरवडेतील गावकरी-मानकऱ्यांतील वाद गेली कित्येक वर्षे सुरू होता. यावादामुळे गावात कोणत्याही चांगल्या कामाची निर्मिती झाली नाही. उलट गावाची बदनामीच होत होती. पण या समन्वय बैठकीतील सर्व मान्य तोडग्याने गावाच्या समृद्ध वाटचालीचे नवे पर्व सुरू झाल्याच्या भावना व्यक्त करण्यात आल्या.

Web Title: Ultimately, the 'ultimate problem' will be resolved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.