उमेद अभियान खाजगी कंपनीच्या हातात, अब्दूल सत्तार यांचे स्पष्ट संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2020 11:06 PM2020-11-02T23:06:47+5:302020-11-02T23:07:55+5:30

उमेदसाठी शंभर कोटीची बँक उभारणार

Umed Abhiyan in the hands of a private company, a clear indication of Abdul Sattar | उमेद अभियान खाजगी कंपनीच्या हातात, अब्दूल सत्तार यांचे स्पष्ट संकेत

उमेद अभियान खाजगी कंपनीच्या हातात, अब्दूल सत्तार यांचे स्पष्ट संकेत

googlenewsNext
ठळक मुद्देबचत गटांच्या महिलांनी उमेद अभियान सुरू ठेवा तसेच उमेदच्या कर्मचाºयांना काढू नका अशा वेगवेगळ्या मागण्या यावेळी केल्या. यावर मंत्री सत्तार यांनी तुम्ही उमेद अभियान खाजगी कंपनीच्या ताब्यात देउ नका हे कशासाठी सांगता असा सवाल केला.

सावंतवाडी : सध्या राज्यात गाजत असलेल्या ‘उमेद’ अभियान खाजगी कंपनीच्या हातात देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, त्यावर राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री अब्दूल सत्तार यांनी शिक्कामोर्तब केले असून, ‘उमेद’ ची शंभर कोटीची बँक उभी करणार असल्याचे सुतोवाचही मंत्री सत्तार यांनी केले आहे. आंबोलीहून सावंतवाडीकडे येत असताना माडखोल येथील शाळेत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान म्हणजेच उमेदकडून आयोजित केलेल्या प्रदर्शनाला मंत्री सत्तार यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी संपूर्ण बचत गटाची पाहणी केली. तसेच वेगवेगळ्या वस्तूही विकत घेत महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तूचे तोंड भरून कौतुक केले.

बचत गटांच्या महिलांनी उमेद अभियान सुरू ठेवा तसेच उमेदच्या कर्मचाºयांना काढू नका अशा वेगवेगळ्या मागण्या यावेळी केल्या. यावर मंत्री सत्तार यांनी तुम्ही उमेद अभियान खाजगी कंपनीच्या ताब्यात देउ नका हे कशासाठी सांगता असा सवाल केला.  त्यावर महिला गप्प बसल्या. तुम्ही कार्यालयीन कर्मचाºयांना कमी करणार, असे आम्हाला वाटते. त्यामुळे आम्ही सांंगितले असल्याचे महिलांनी सांगताच कर्मचाºयांचे तुम्ही बघू नका बचत गटांच्या मालाला जास्तीत जास्त किंमत कशी मिळेल, तुमचा माल बाहेर कसा विक्री होईल हे बघा, बचत गटांना कुठेही धोका उद्भवणार नाही यांची खात्री आम्ही देतो. मात्र आता उमेद अभियान खाजगी कंपनीच्या ताब्यात गेले आहे. त्याला आम्ही काहि करू शकत नाही. यावर मुख्यमंत्रीच निर्णय घेउ शकतात, असेही मंत्री सत्तार म्हणाले. उमेदची शंभर कोटींची बँक उभी करण्यात येणार असून, त्यातून सर्व कारभार चालणार आहे. बचत गटांना प्रोत्साहन देण्यात येणार असून, जास्तीत जास्त महिलांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Web Title: Umed Abhiyan in the hands of a private company, a clear indication of Abdul Sattar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.