उमेद कर्मचाऱ्यांची नीतेश राणेंकडे धाव,सरकारला जाब विचारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 05:25 PM2020-09-28T17:25:33+5:302020-09-28T17:29:04+5:30

उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील एकाही कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. या अभियानाच्या माध्यमातून या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आमच्या लाखो महिलांना आत्मनिर्भर बनविण्याचे काम केले आहे. त्या कर्मचाऱ्यांवरच अशी वेळ यावी हे दुर्दैव आहे. राज्य सरकारला आपण याचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, असे आश्वासन भाजपा आमदार नीतेश राणे यांनी उमेदच्या कर्मचाऱ्यांना दिले.

Umed employees run to Nitesh Rane and ask for answers | उमेद कर्मचाऱ्यांची नीतेश राणेंकडे धाव,सरकारला जाब विचारणार

उमेदच्या कर्मचाºयांनी आमदार नीतेश राणे यांची कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी भेट घेतली.

Next
ठळक मुद्देउमेद कर्मचाऱ्यांची नीतेश राणेंकडे धावकर्मचाऱ्यांवर होणाऱ्या या अन्यायाचा जाब सरकारला विचारणार

कणकवली : उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील एकाही कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. या अभियानाच्या माध्यमातून या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आमच्या लाखो महिलांना आत्मनिर्भर बनविण्याचे काम केले आहे. त्या कर्मचाऱ्यांवरच अशी वेळ यावी हे दुर्दैव आहे. राज्य सरकारला आपण याचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, असे आश्वासन भाजपा आमदार नीतेश राणे यांनी उमेदच्या कर्मचाऱ्यांना
दिले.

उमेदच्या कर्मचाऱ्यांनी आमदार नीतेश राणे यांची कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी भेट घेतली. यावेळी कणकवलीच्या माजी सभापती सुजाता हळदिवे, पंचायत समिती सदस्य मनोज रावराणे, विस्तार अधिकारी रवी मेस्त्री, भाजपा युवा मोर्चाचे संदीप मेस्त्री, उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या कणकवली तालुक्यातील प्रभाग समन्वयक सिया गावडे, ज्ञानदा सावंत, अमृता चव्हाण यांच्यासह सीआरपी ताई आदी उपस्थित होत्या.

यावेळी आमदार राणे म्हणाले, राज्य शासनाने अचानकपणे अधिकाऱ्यांची सेवा थांबवणे हा अन्याय आहे. सध्या कोविडचा काळ सुरू आहे. आधीच लोक बेकार होत आहेत. अशात शासनाचे हे धोरण योग्य नाही.

शासनाकडे कर्मचाऱ्यांचा पगार द्यायला निधी नसल्याने हा निर्णय घेतला गेला आहे. तरी कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या या अन्यायाचा जाब आपण सरकारला विचारल्याशिवाय राहणार नाही असे राणे यांनी सांगितले. राज्याचे ग्रामविकास मंत्री यांची आपण मुंबई येथे भेट घेऊन त्यांच्याशी आपण चर्चा करू व योग्य तो तोडगा काढू, असेही आमदार राणे यांनी स्पष्ट केले.
 

Web Title: Umed employees run to Nitesh Rane and ask for answers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.