कणकवलीतील अवैध बांधकाम हटविले, नगरपंचायतीची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 16:55 IST2018-06-13T16:55:34+5:302018-06-13T16:55:34+5:30
कणकवली येथील मुडेडोंगरीच्या आरक्षित जमिनीवरील अवैध बांधकामावर नगरपंचायतीने कारवाई केली. पोलीस संरक्षणात तेथील अवैध बांधकाम हटविण्यात आले.

कणकवलीतील अवैध बांधकाम हटविले, नगरपंचायतीची कारवाई
कणकवली : कणकवली येथील मुडेडोंगरीच्या आरक्षित जमिनीवरील अवैध बांधकामावर नगरपंचायतीने कारवाई केली. पोलीस संरक्षणात तेथील अवैध बांधकाम हटविण्यात आले.
कणकवलीतील मुडेडोंगरी येथील आरक्षित जमिनीत वाणिज्य गाळे बांधण्यात आले होते. तसेच तिथे पत्र्याची कपाटे व इतर साहित्य बनविले जात होते.
कणकवली येथील मुडेडोंगरी येथील अवैध बांधकाम हटविण्यात आले.
नगरपंचायतीने संबधित गाळेधारकास अवैध बांधकाम हटविण्याबाबत सुचनाही दिली होती. मात्र त्याने हे गाळे न हटविल्याने अखेर पोलीस संरक्षणात संबधित बांधकाम नगरपंचायतीच्यावतीने हटविण्यात आले.
यावेळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अवधूत तावडे, पोलीस उपनिरीक्षक घाडगे यांच्यासह पोलीस पथक व नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, कणकवली नगरपंचायतीने सलग दुसऱ्या दिवशी अवैध बांधकाम हटविण्याचे काम केले आहे. या कारवाईत सातत्य राखत नगरपंचायतीने शहरातील इतर अनधिकृत बांधकामे शोधून त्यांच्यावरही तातडीने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.