ग्रामस्थांना धमक्या देत साटेलीत अनधिकृत मायनिंग उत्खनन, सिंधुदुर्गात ही वाल्मिक कराड; संदेश पारकर यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 22:28 IST2025-01-21T22:28:40+5:302025-01-21T22:28:58+5:30
योग्य बंदोबस्त प्रशासनाकडून करण्यात यावा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून जाब विचारू असा इशारा उध्दव सेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दिला आहे.

ग्रामस्थांना धमक्या देत साटेलीत अनधिकृत मायनिंग उत्खनन, सिंधुदुर्गात ही वाल्मिक कराड; संदेश पारकर यांचा आरोप
सावंतवाडी : साटेली तर्फ सातार्डा येथे बेकायदेशीर उत्खनन सुरू आहे. शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या इकोसेन्सेटिव्ह भागात हे मायनिंग असतना? प्रशासनाकडून ही परवानगी देण्यात आली आहे.सर्व नियम धाब्यावर बसवून स्थानिकांच्या पोटावर लाथ मारणारा वाल्मिक कराड सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोण जन्माला आला आहे.त्याचा योग्य बंदोबस्त प्रशासनाकडून करण्यात यावा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून जाब विचारू असा इशारा उध्दव सेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दिला आहे. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी निशांत तोरसकर रामा सावंत अवधूत मालणकर आदि उपस्थित होते. साटेली गावात ग्रामपंचायत चा विरोधी ठराव असतना तसेच ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यात तक्रारी केल्या असतना ही त्या तक्रारी ची कोणतीही दखल न घेता पोलिसांकडून स्थानिकावरच अन्याय सुरू आहे.कायद धाब्यावर बसवून मायनिंग होत आहे.याला माझा तीव्र विरोध आहे.
या अनधिकृत मायनिंग विरोधात माझी लढाई सुरू असून ती यापुढे ही सुरू राहील, हे मायनिंग बंद न झाल्यास जन आंदोलन उभारु असा इशारा पारकर यांनी दिला आहे. स्थानिकांनी मायनिंगला विरोध केला असता सरपंचांसह लोकप्रतिनिधींंना धमक्या दिल्या जात आहेत जिल्ह्यात कोणीतरी वाल्मिक कराड तयार व्हायला नको असे मत पारकर यांनी व्यक्त केले.
यामागे कोणाचा वरदहस्त आहे हे शोधण गरजेचे आहे. १६ लाख टन बेकायदेशीर मायनिंग उत्खनन येथून परदेशात निर्यात होणार आहे. स्थानिक ग्रामस्थ, डंपर व्यवसायिक यांचाही याला विरोध आहे. अधिकृत मायनिंग असेल तर माझा याला विरोध नाही.पण दुसऱ्या नावावर परवाना मायनिंग तिसराच काढतो ते पण बेकायदेशीर मायनिंग उत्खनन आम्ही हे खपवून घेणार नाही असा इशारा पारकर यांनी दिला. तसेच याबाबत मंगळवारी झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी मायनिंग विरोधात ठराव घेतल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, याला विरोध करणाऱ्या सरपंच, ग्रामस्थांसह लोकप्रतिनिधींना दिली जात आहे. त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. याची दखल वेळीच सर्व संबंधितांनी घ्यावी, प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होऊ नये. अन्यथा सिंधुदुर्ग जिल्ह्यात बीड पॅटर्न खपवून घेणार नाही असा इशारा पारकर यांनी दिला आहे.