उड्डान-३ अंतर्गत महाराष्ट्र राज्याला पर्यटनवृध्दीसाठी ५00 कोटी रुपयांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 04:24 PM2019-01-30T16:24:37+5:302019-01-30T16:25:47+5:30
उड्डान- ३ अंतर्गत महाराष्ट्रातील पर्यटनवृध्दीसाठी ५०० कोटी रुपयांच्या निधीची तरतुद केंद्रीय व्यापार मंत्रालयाकडून करण्यात आली आहे. चिपी- सिंधुदुर्ग व रत्नागिरी येथील विमानतळाचा या योजनेअंतर्गत समावेश केला आहे. सागरी किना-यावर विमान वाहतुकीची सुविधा व्हावी यासाठी देशातील ३५ सागरी किना-यांची निवड केली आहे. याचबरोबरच सीप्लेन या अंतर्गतही कोकणातील किना-यावर लवकरच ही सुविधा सुरु करण्याचा मानस आहे.
सिंधुदुर्गनगरी: उड्डान- ३ अंतर्गत महाराष्ट्रातील पर्यटनवृध्दीसाठी ५०० कोटी रुपयांच्या निधीची तरतुद केंद्रीय व्यापार मंत्रालयाकडून करण्यात आली आहे. चिपी- सिंधुदुर्ग व रत्नागिरी येथील विमानतळाचा या योजनेअंतर्गत समावेश केला आहे. सागरी किना-यावर विमान वाहतुकीची सुविधा व्हावी यासाठी देशातील ३५ सागरी किना-यांची निवड केली आहे. याचबरोबरच सीप्लेन या अंतर्गतही कोकणातील किना-यावर लवकरच ही सुविधा सुरु करण्याचा मानस आहे.
सांवतवडी रेल्वे टर्मिनस विकासाबरोबर येथे रेलोटेल हे हॉटेल सुरु होणार आहे. यामधूनच रेल्वे, विमानसेवा, सीप्लेन यांच्या माध्यमातून कोकणातील पर्यटन वाढीस लागणार असून तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल असा विश्वास केंद्रीय व्यापार, उद्योग व नागरी उड्डान मंत्री सुरेश प्रभू यांनी सावंतवाडी रेल्वे स्थानक येथे आयोजित समारंभात बोलताना व्यक्त केला.
चांदा ते बांदा योजनेअंतर्गत रेलोटेल साठी 14 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या रेलोटेल हॉटेलचे भुमिपूजन तसेच रत्नागिरी रनिग रुमच्या वातानुकुलन यंत्रणेचे (रिमोटव्दारे) लोकार्पण सोहळ्यात श्री. प्रभू बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, राजन तेली, पुष्पसेन सावंत, नकुल पारसेकर, अतुल काळसेकर, अन्नपुर्णा कोरगावकर, कोकण रेल्वेचे एमडी श्री. गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी रेलोटेलची संकल्पना विशद करुन पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले की, पर्यटनकांना निवासाची चांगली सुविधा निर्माण व्हावी याचबरोबर चांगल्या दजार्चे कोकणी खाद्य पदार्थ मिळावेत यासाठी हे ४० खोल्यांचे हॉटेल उभारले जात आहे. फुड कोर्टच्या माध्यमातून उच्च दजार्चे खाद्य पदार्थ मिळावेत याचबरोबर स्थानिक महिलांनाही या हॉटेल च्या माध्यमातून रोजगार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होण्यास मदत होणारआहे. राजधानी एक्सप्रेस बरोबरच इतर ट्रेनही सावंतवाडी येथे थांबाव्यात तसेच गोव्यातून कारवारला जशी डेमो ट्रेन सुरु केली आहे याच धर्तीवर गोव्यातून सिंधुदर्गलाही डेमो ट्रेन सुरु करण्याबाबत प्रभू साहेबांनी प्रयत्न करावेत अशी त्यांनी यावेळी विनंती केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या वाढत आहे असे सांगुन खासदार विनायक राऊत म्हणाले की, सांवतवाडी टर्मिनस येथे उभ्या राहत असलेल्या रेलोटेल हॉटेलच्या माध्यमातून काही अंशी पर्यटकांची गरज पुर्ण होण्यास मदत होणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणा-या एक्सप्रेस गाड्यांना जिल्ह्यातील कणकवली, सिंधुदुर्गनगरी, सांवतवाडी या स्थानकावर थांबे मिळावेत.
जिल्ह्यातून जाणा-या मांडवी, कोकण कन्या, तुतारी आदी गाड्याना बहुतांशी वेळेला साईडींगला टाकली जाते. हा कोकणातील रेल्वे प्रवाशाच्या दृष्टीने गैरसोयीचे आहे. याबाबत कोकण रेल्वेच्या प्रशासनाने योग्य ती काळजी घ्यावी. तेजस एक्सप्रेसला सावंतवाडी व कणकणली येथे थांबा मिळावी अशीही त्यांनी शेवटी विनंती केली.